Opt-Out Scheme : सीए परीक्षा 2021 साठी बसणाऱ्या परीक्षर्थींसाठी opt-out पर्याय देण्याचे सुप्रीम कोर्टाने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाला आदेश दिले आहेत. सीएची परीक्षा 5 जुलैपासून सुरू होणार आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी अथवा कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची ची लागण झाली असल्यास अधिकृत डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट दाखवून ते परीक्षा देणे टाळू शकतात, असेही कोर्टाने म्हटले आहे आयसीएआयने विद्यार्थ्यांना RTPCR टेस्ट बंधनकारक केली होती, तथापि, कोर्टाने ही अटही मागे घेतली आहे. supreme court orders icai to issue opt out scheme for ca exams in july 2021
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सीए परीक्षा 2021 साठी बसणाऱ्या परीक्षर्थींसाठी opt-out पर्याय देण्याचे सुप्रीम कोर्टाने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाला आदेश दिले आहेत. सीएची परीक्षा 5 जुलैपासून सुरू होणार आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी अथवा कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची ची लागण झाली असल्यास अधिकृत डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट दाखवून ते परीक्षा देणे टाळू शकतात, असेही कोर्टाने म्हटले आहे आयसीएआयने विद्यार्थ्यांना RTPCR टेस्ट बंधनकारक केली होती, तथापि, कोर्टाने ही अटही मागे घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एएम खानविलकर, दिनेश महेश्वरी आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठापुढे आज सीए परीक्षावरील सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने SOPवर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, खंडपीठाला ही SOP योग्य न वाटल्याने ICAIला यात बदल करण्यास सांगण्यात आले आहे.
कशी आहे Opt-out Scheme?
- स्वत:ला किंवा कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्यास अधिकृत डॉक्टरांचे सर्टिफिकेट सादर करून विद्यार्थी परीक्षा देणे टाळू शकतात. तसंच हा प्रयत्न म्हणून गणला जाणार नाही. पुढे नोव्हेंबरमध्ये त्यांना परीक्षा देता येईल.
- या परिस्थितीत परीक्षार्थींना जुना आणि नवा कोर्स 2021 मध्ये रिपीट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- Opt-outसाठी परीक्षार्थीना RTPCR टेस्ट रिपोर्ट सादर करण्याची गरज नाही.
- शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रात बदल करण्याच्या ICAIच्या मुद्दाला खंडपीठाने नकार दिला आहे.
- परीक्षांच्या नियमांमध्ये बदल न करण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याचवेळी opt-out हा पर्याय विद्यार्थ्यांना विनाकारण वापरता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले आहे.
- दरम्यान, सीएच्या अंतिम परीक्षा 5 ते 19 जुलैदरम्यान होणार आहेत. तर CA Inter परीक्षा 6 जुलै आणि CA Foundation परीक्षा 20 जुलै रोजी होणार आहे.
supreme court orders icai to issue opt out scheme for ca exams in july 2021
महत्त्वाच्या बातम्या
- खेल रत्न पुरस्कारासाठी मिथाली राज, आर. अश्विनच्या नावाची शिफारस, अर्जुन पुरस्कारासाठी 3 खेळाडू नामांकित
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक; आमदार थोपटे, पटेलांचे नाव आघाडीवर
- दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनियाची लागण, हिंदुजा रुग्णालयात दाखल
- कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी मिळणार भरपाई, सुप्रीम कोर्टाचे NDMAला रक्कम ठरवण्याचे निर्देश
- सावधान : कोरोनाची लस घेण्यापूर्वी पेन किलर वापरू नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा