• Download App
    सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : 2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात नरोडा वगळता सर्व खटले बंद|Supreme Court order: All cases except Naroda in 2002 Gujarat riots case closed

    सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : 2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात नरोडा वगळता सर्व खटले बंद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : 2002 च्या गुजरात दंगलीशी संबंधित नऊ खटले बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश यू. यू. लळित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट व न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, आता या याचिकांवर विचार करण्याची गरज नाही. मात्र, नरोडा गावातील दंगलीशी संबंधित खटला बंद केलेला नाही.Supreme Court order: All cases except Naroda in 2002 Gujarat riots case closed

    हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात सुरू आहे. सरन्यायाधीश लळित म्हणाले, 10 याचिकांच्या मागणीवरून 9 प्रकरणांच्या चौकशीसाठी तपास पथक स्थापन केले होते. यापैकी 8 प्रकरणांचा तपास व सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणांशी संबंधित तिस्ता सेटलवाड यांना संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका प्रलंबित आहे, असे वकील अर्पणा भट यांनी सांगितले. त्यावर सेटलवाड यांना अर्ज करण्याची मुभा दिली.



    अवमाननेची कार्यवाही बंद

    1992 च्या बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार आणि इतरांविरुद्ध अवमानना कारवाई बंद केली. न्यायमूर्ती एस.के. कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने घटनापीठाच्या नोव्हेंबर 2019 च्या निकालाचा संदर्भ देत म्हटले की, हे प्रकरण आधी सुनावणीसाठी आणायला हवे होते.

    Supreme Court order: All cases except Naroda in 2002 Gujarat riots case closed

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!

    Kavinder Gupta : लडाखमध्ये LG आणि हरियाणा-गोव्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती; कविंदर गुप्ता यांना केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते