कोरोना झाल्यानंतर आयसोलेशनमध्ये राहण्याच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड तब्बल १८ दिवस आपल्या कार्यालयातच आयसोलेट राहिले होते. एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीच स्वत: ही माहिती दिली. Supreme Court Judge Corona remained in isolation for 18 days in office
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना झाल्यानंतर आयसोलेशनमध्ये राहण्याच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड तब्बल १८ दिवस आपल्या कार्यालयातच आयसोलेट राहिले होते.
एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीच स्वत: ही माहिती दिली.सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीच्या वेळी चक्क न्यायाधिश आणि ज्येष्ठ वकीलांमध्ये कोरोनासंदर्भात चर्चासुरू झाली.
यावेळी न्यायाधिशांनी आणि वकीलांनी आपले कोरोना काळातील अनुभव सांगितले. चंद्रचूड यांनी सांगितले की कोरोना झाल्यावर आपल्या कुटुंबियांना त्याची बाधा होऊ नये यासाठीते १८ दिवस त्यांच्या कार्यालयातच आयसोलेट राहिले.
कुटुंबातील इतर कोणताही सदस्य बाधित होऊ नये असे मला वाटत होते. मात्र नंतर माझी पत्नीदेखील कोरोनाने बाधित झाली. त्या वेळी मी बरा होत होतो. म्हणून मला माझ्या घरी परत जायचे नव्हते.
या काळात माझे मन शांत ठेवण्यासाठी माज्याकडे एकच पर्याय होता आणि तो होता माझी पुस्तके, त्यांच्याकडून मला खूपच मदत झाली.ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की,
गेल्या वर्षी जूनमध्ये मला कोरोना संसर्ग झाला होता. त्यातून बरा झाल्यानंतर शरीरात अँटिबॉडी तयार झाल्या आणि आता मी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यामुळे मला तिप्पट संरक्षण मिळाले आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे यांनी सांगितले की, ते कोरोनाच्या संसगार्पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात एकटेच राहतात. स्वत:च दिवे लावतात.
आपल्याच कार्यालयात एकटे राहणे एखाद्या वकिलासाठी खूपच कंटाळवाणे आहे. कोणीही आत येत नाही आणि बाहेरही जात नाही.
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ महावीर सिंह म्हणाले की, हे प्रकरण पुढच्या सुनावणीच्या वेळी प्रत्यक्ष न्यायालयात ऐकले जावे,
अशी देवाला प्रार्थना करतो. यावर हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध न्या. चंद्रचूड यांनी सांगितले की, लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावे व त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी सुरू व्हावी, अशी माझीही देवाकडे प्रार्थना आहे.
Supreme Court Judge Corona remained in isolation for 18 days in office
महत्त्वाच्या बातम्या
- देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात, मुंबई ठरली देशात अव्वल
- लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी थोपटली जवानांची पाठ, शस्त्रसंधीला १०० दिवस पूर्ण
- मनी मॅटर्स : कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजे काय?
- इस्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची गच्छंती अटळ, सत्ता स्थापनेसाठी सर्व विरोधक एकत्र
- कॅनडात निवासी शाळेच्या जागेत २१५ मुलांचे सांगाडे, धर्मांतराप्रकरणी पोप यांनी माफी मागावी