NTA आणि केंद्राकडून उत्तर मागितले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : NEET पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि केंद्राकडून उत्तरे मागवली आहेत. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले की, “जर एखाद्याच्या बाजूने 0.001% निष्काळजीपणा असेल तरी त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे.” सुप्रीम कोर्ट आता या प्रकरणी 8 जुलै रोजी पुढील सुनावणी घेणार आहे.
एमबीबीएससह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET परीक्षेत हेराफेरीचा आरोप झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. यावेळी या परीक्षेत 78 उमेदवारांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याने कथित हेराफेरी उघडकीस आली.
त्यानंतर अनेक उमेदवारांनी यासंदर्भात चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. याआधीही सुप्रीम कोर्टाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) नोटीस बजावून उत्तर मागितले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने NEET परीक्षेच्या प्रकरणी पुन्हा नोटीस बजावली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी समुपदेशनावर बंदी घातलेली नाही.
Supreme Court issued notice in NEET paper leak case
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार