• Download App
    फेररचनेनंतर केवळ कोणत्याही एकाच राज्यात मिळणार आरक्षणाचा लाभ| Supreme court gives important verdit in terms of reservation

    फेररचनेनंतर केवळ कोणत्याही एकाच राज्यात मिळणार आरक्षणाचा लाभ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – ‘‘ एकत्र असलेल्या किंवा विभक्त न झालेल्या राज्यात आरक्षणाचा लाभ घेणारी व्यक्ती त्या राज्याचे विभाजन झाल्यानंतर मात्र कोणत्या तरी एका राज्यामध्येच आरक्षणाचा लाभ घेऊ शकते पण तिला दोन्ही राज्यांतील आरक्षणावर दावा करता येऊ शकत नाही’’ असे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. Supreme court gives important verdit in terms of reservation

    झारखंडचे रहिवासी आणि अनुसूचित जातींचे सदस्य असलेल्या पंकज कुमार यांनी सनदी सेवेमध्ये २००७ साली उच्च न्यायालयाने नियुक्ती नाकारणारा आदेश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. पंकजकुमार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून ते बिहारच्या पाटणा येथील रहिवासी असल्याचे दिसून येते.



    आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला एका राज्यामध्ये आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो पण दोन्ही राज्यांमध्ये तिला तसा दावा करता येत नाही. बिहारमधील रहिवासी हे झारखंडमध्ये जेव्हा खुल्या श्रेणीतून अर्ज करतात तेव्हा त्यांचा स्थलांतरित म्हणून विचार करण्यात यावा, ते तेथे आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत. हेच तत्त्व झारखंडच्या नागरिकांनादेखील लागू होते असे न्यायालयाने म्हटले आहे.

    Supreme court gives important verdit in terms of reservation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य