• Download App
    मोदींच्या पंजाब दौर्‍याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पाच सदस्यीय समिती स्थापन|Supreme Court forms five-member committee on Modi's Punjab visit

    मोदींच्या पंजाब दौर्‍याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पाच सदस्यीय समिती स्थापन

    न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड समितीच्या अध्यक्षा इंदू मल्होत्रा ​​यांच्याकडे सोपवावे.Supreme Court forms five-member committee on Modi’s Punjab visit


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये एका उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अचानक थांबतो. 15 मिनिटं मोदींच्या गाड्या आहे तिथेच उभ्या राहतात.या उड्डाणपुलापासून पाकिस्तानची सीमा अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर होते.

    दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्‍यात सुरक्षेत झालेल्या चुकीप्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी सेवानिवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली.ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे.



    पंतप्रधानांच्या सुरक्षेशी निगडित जप्त करण्यात आलेले सर्व दस्तावेज तातडीने समितीच्या अध्यक्ष न्या. इंदू मल्होत्रा यांना सोपवावे, असा आदेश न्यायासनाने पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना दिला आहे.

    समितीत यांचा आहे समावेश

    या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा, डीजी एनआयए, डीजी चंदीगड आणि पंजाबचे सुरक्षा एडीजीपी यांचा समावेश असणार आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड समितीच्या अध्यक्षा इंदू मल्होत्रा ​​यांच्याकडे सोपवावे.

    Supreme Court forms five-member committee on Modi’s Punjab visit

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के