supreme court : ‘सबका साथ सबका विश्वास’ हे घोषवाक्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवरून पंतप्रधानांचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एनआयसीला सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेलमध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेसह पंतप्रधानांच्या फोटोच्या समावेशावरील कथित वादाची अखेर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे छायाचित्र लावण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी सांगितले की, घोषणा आणि फोटो अनवधानाने राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी) ठेवले होते. supreme court drops pm photo government slogan from its emails
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘सबका साथ सबका विश्वास’ हे घोषवाक्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवरून पंतप्रधानांचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एनआयसीला सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेलमध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेसह पंतप्रधानांच्या फोटोच्या समावेशावरील कथित वादाची अखेर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे छायाचित्र लावण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी सांगितले की, घोषणा आणि फोटो अनवधानाने राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी) ठेवले होते.
एका अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या निदर्शनास काल संध्याकाळी हे आणण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलमध्ये तळाशी एक प्रतिमा आहे, ज्याचा न्यायव्यवस्थेच्या कामकाजाशी काहीही संबंध नाही.” ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या ई-मेलमध्ये समाविष्ट असलेली ती प्रतिमा हटवण्याचे निर्देश दिले होते, यावर एनआयसीने त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा लावली आहे.”
एका अधिकाऱ्याने ई-मेलचा स्क्रीनशॉटही शेअर केला, ज्यात घोषणा आणि पंतप्रधान मोदींच्या फोटोऐवजी न्यायालयाचा फोटो होता. एनआयसी ही संस्था सर्वोच्च न्यायालयाला ई-मेल सेवा पुरवते. त्यांनी म्हटले की, काही जणांच्या अनावधानाने झालेल्या चुकीमुळे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
supreme court drops pm photo government slogan from its emails
महत्त्वाच्या बातम्या
- आघाडीत बिघाडी : आता काँग्रेस नेत्यानेच राज्यपाल कोश्यारींना लिहिले पत्र, साकीनाका प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंवर ‘व्होट बँके’चे राजकारण केल्याचा आरोप
- Punjab Cabinet Expansion : रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता चन्नी मंत्रिमंडळाचा विस्तार, सात नवीन चेहऱ्यांचा समावेश
- मोठी बातमी : कम्युनिस्ट कन्हैया होणार काँग्रेसी, जिग्नेश मेवानीसह 28 सप्टेंबरला होणार प्रवेश सोहळा
- १२००० कोटी विरूद्ध १.३४,४९९ कोटी; माजी कृषिमंत्र्यांना केंद्रीय सहकार मंत्र्यांनी दाखविला कृषी बजेटचा “आरसा”
- जाणून घ्या देशात पहिल्या आलेल्या युपीएससी टॉपर शुभम कुमार ची कहाणी