Cases Against Italian Marines : २०१२ मध्ये केरळच्या दोन मच्छीमारांना ठार केल्याच्या आरोपाखाली इटालियन नाविकांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतात चालू असलेल्या फौजदारी खटल्याला बंद केले. केंद्राच्या याचिकेचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. Supreme Court Closes Cases Against Italian Marines Accused Of Killing Fishermen Of Kerala
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : २०१२ मध्ये केरळच्या दोन मच्छीमारांना ठार केल्याच्या आरोपाखाली इटालियन नाविकांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतात चालू असलेल्या फौजदारी खटल्याला बंद केले. केंद्राच्या याचिकेचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या सुटीतील खंडपीठाने घटनेच्या कलम 142 अन्वये दिलेल्या विशेष अधिकारांतर्गत हा निर्णय घेतला आहे. पीडितेचे कुटुंब नुकसानभरपाईवर समाधानी आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात सध्या सुरू असलेली सुनावणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीडित कुटुंबांना मिळेल भरपाईची रक्कम
इटलीने भरलेल्या 10 कोटींची भरपाईची रक्कम केरळ उच्च न्यायालयात वर्ग करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालय पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणार आहे. दोन कुटुंबांना प्रत्येकी चार कोटी रुपये, तर दोन कोटी रुपये बोटीच्या मालकास देण्यात येतील.
सुप्रीम कोर्टानेही केंद्र आणि केरळ सरकारला इटलीतील सागरी खटल्यांमध्ये सर्व साहाय्य करण्यास सांगितले आहे. खरंतर नुकसान भरपाईची घोषणा करताना आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने असेही म्हटले आहे की, इटालियन मरीनवर खटला चालविण्याचा अधिकार राखून ठेवला जाईल. भारत सरकार आणि केरळ सरकारने दोघांनीही न्यायाधिकरणाचा अवॉर्ड स्वीकारला.
काय होते प्रकरण?
हे प्रकरण २०१२ सालचे आहे, जेव्हा भारतीय मच्छीमारांची ‘सेन्टर अँटनी’ ही फिशिंग बोट इटालियन टँकर ‘एरिका लेक्सी’ जवळ जात होती. या जहाजात बसलेले दोन इटालियन खलाशी, मॅसिमॅनो लाटोरे आणि साल्वाटोर गिरोन यांनी ‘सेंट अँटनी’ला चोरटी बोट म्हणून चुकवले आणि त्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन भारतीय मच्छीमार ठार झाले होते.
Supreme Court Closes Cases Against Italian Marines Accused Of Killing Fishermen Of Kerala
महत्त्वाच्या बातम्या
- Covid Alarm : ब्रिटिश शास्त्रज्ञांनी बनवला कोविड अलार्म, आता तपासणीशिवाय 15 मिनिटांत होईल कोरोनाग्रस्तांची ओळख
- बसपाचे बंडखोर आमदार अखिलेश यादवांना भेटले, पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उधाण, मायावतींना मोठा धक्का
- Antilia Case : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIA कडून दोन जणांना अटक, 21 जूनपर्यंत कोठडी
- मुजोर चीनला आर्थिक आघाडीवर उत्तर, 43 टक्के भारतीयांकडून वर्षभरात एकाही चिनी वस्तूची खरेदी नाही
- कोरोना लसीमुळे देशात पहिला मृत्यू झाल्याचा सरकारी समितीचा खुलासा, लस घेतल्यावर कोणती लक्षणे गांभीर्याने घ्यावी, वाचा सविस्तर…