• Download App
    गँगस्टर विकास दुबे एन्काउंटर केसमध्ये यूपी पोलिसांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय । Supreme Court Clean chit to UP police in gangster Vikas Dubey encounter case

    गँगस्टर विकास दुबे एन्काउंटर केसमध्ये यूपी पोलिसांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

    Vikas Dubey Encounter Case : कुख्यात गुन्हेगार विकास दुबे एन्काउंटर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना पुराव्याअभावी सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. एस. चौहान समितीने उत्तर प्रदेश पोलिसांना क्लीन चिट दिली आहे. Supreme Court Clean chit to UP police in gangster Vikas Dubey encounter case


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कुख्यात गुन्हेगार विकास दुबे एन्काउंटर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना पुराव्याअभावी सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. एस. चौहान समितीने उत्तर प्रदेश पोलिसांना क्लीन चिट दिली आहे.

    तीन सदस्यीय समितीने केली होती चौकशी

    समितीला यूपी पोलिसांविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत. विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर सुप्रीम कोर्टाने गठित केलेल्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.एस. चौहान यांच्या त्रिसदस्यीय समितीने अनेक पोलिसांची चौकशी केली. परंतु समितीला पोलिसांविरुद्ध एकही सबळ पुरावा सापडला नाही. यामुळे पुराव्याअभावी विकास दुबे एन्काउंटर केसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांना क्लीन चिट देण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.एस. चौहान यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, यूपी पोलिसांविरुद्ध त्यांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीत सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.एस. चौहान, डीजीपी के.एल. गुप्ता आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शशिकांत अग्रवाल यांचा समावेश होता.

    काय आहे प्रकरण?

    2 जुलै 2020 रोजी कानपूरच्या बकरू गावात आठ पोलिसांना कुख्यात गँगस्टर विकास दुबेने ठार केले होते. यानंतर आरोपी विकास दुबेला मध्य प्रदेशातील उज्जैन येथून एका आठवड्यानंतर अटक करण्यात आली होती, परंतु 24 तासांत कानपूरजवळ पोलीस चकमकीत विकास दुबेचा मृत्यू झाला.

    विकास दुबेला उज्जैनहून एसटीएफ व यूपी पोलिसांच्या पथकाने गाडीने आणले होते. यादरम्यान कानपूरजवळ मुसळधार पाऊस सुरू झाला आणि ज्या गाडीत विकास दुबे बसला होता ती उलटली. वाहन उलटल्यानंतर विकास दुबेने पोलिसांचे हत्यार हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर विकास दुबेने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी विकास दुबेवर गोळीबार केला, यातच या गँगस्टरचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

    Supreme Court Clean chit to UP police in gangster Vikas Dubey encounter case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक