प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर घडलेल्या सत्तांतराचा तिढा सोडवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र खंडपीठाकडे म्हणजे घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लवकरच घटनापीठ स्थापन करून निर्णय देण्यात येईल, असे सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांचे निलंबन ताबडतोब करता येणार नाही, असेही सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आदेश दिले आहेत. Supreme Court bans immediate disqualification of 16 MLAs from Shinde faction
राज्यात घडलेल्या सत्तांतरादरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतू तुर्तास राज्यातील स्थिती जैसे थे राहील असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात राज्यपालांचे अधिकार, विधानसभा उपाध्यक्ष यांचे अधिकार, उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आणि आमदारांची अपात्रतता या सर्व बाबींबासाठी घटनापीठ स्थापन करण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील निर्णयापर्यंत 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
Supreme Court bans immediate disqualification of 16 MLAs from Shinde faction
महत्वाच्या बातम्या
- शिंदे फडणवीस सरकारचे आज ठरणार भवितव्य??; पण सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर??; झिरवाळांच्या उत्तराचा काय परिणाम??
- गोव्यात काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न” रोखण्यासाठी सोनिया गांधींची मुकुल वासनिकांवर जबाबदारी!!
- शिंदे फडणवीस सरकारचे उद्या ठरणार भवितव्य; पण सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार??
- संपूर्ण भारत वर्षावर कालीमातेच्या आशीर्वादाची कायमच पाखर!!; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन