सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगिती दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारमधील जात सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या, शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. Supreme Court bans caste survey in Bihar with immediate effect
१ ऑगस्ट रोजी पाटणा उच्च न्यायालयाने बिहारमध्ये जात जनगणनेला मंजुरी दिली होती. पाटणा उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यावर आज म्हणजेच गुरुवारी सुप्रीम कोर्टाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगिती दिली आहे.
याआधी ७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवताना न्यायालयाने म्हटले होते की, ८० टक्के काम झाले असेल, तर ९० टक्केही होईल, त्यामुळे काय फरक पडणार? तत्काळ थांबण्याची गरज काय?
Supreme Court bans caste survey in Bihar with immediate effect
महत्वाच्या बातम्या
- ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘सबवे’ नंतर आता ‘बर्गर किंग’ देखील मेनूकार्ड मधून टोमॅटो गेले गायब!
- ”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!
- राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार आणि अजित पवार गटाला नोटीस, उत्तरासाठी तीन आठवड्यांची मुदत
- मीडिया पर्सेप्शन पलीकडले भाजपचे ग्राउंड वर्क सुरू; महाराष्ट्राचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार मध्य प्रदेशात!!