विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास परवानगी देण्याची संरक्षण मंत्रालयाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केली. यामुळे आता ब्रम्होस क्षेपणास्त्र थेट चीन सीमेवर पोहोचू शकणार आहे.Supreme Court allows widening of Char Dham highway, BrahMos missiles can now reach China border directly
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या 8 सप्टेंबर 2020 च्या आदेशात बदल करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने दाखल केलेल्या अजार्ला परवानगी दिली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे.
डोंगराळ भागातील रस्त्यांच्या रुंदीबाबत 2018 च्या परिपत्रकानुसार महामार्गांसाठी साडेपाच मीटर रुंद डांबरी रस्ता करण्यासच परवानगी आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाला सीमेवर सुरक्षेच्या प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र रेजिमेंट्ससारख्या शस्त्रास्त्रांच्या हालचालीसाठी ही रुंदी अपुरी आहे.
त्यामुळे ही मर्यादा १० मीटरपर्यंत वाढवावी अशी मागणी लष्कराच्या वतीने करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने सांगितले की, सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल आवश्यकतांसाठी ही मागणी योग्य आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा विषय महत्वाचा आहे. यासंदर्भात स्वयंसेवी संस्था सिटीझन्स फॉर ग्रीन दून यांनी याचिका दाखल केली होती.
Supreme Court allows widening of Char Dham highway, BrahMos missiles can now reach China border directly
महत्त्वाच्या बातम्या
- एमपीएससीचा संतापजनक कारभार, आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचे नाव मुलाखतींच्या यादीत
- कर्नाटकातील राजकीय घर, चार सख्खे भाऊ आमदार मात्र वेगवेगळ्या पक्षात
- केंद्राची भेट, देशभरातील शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र
- SANJAY RAUT : आप आए,बहार आई….संजय राऊतांचा किस्सा खुर्ची का नंतर राहुल गांधींसाठी खास गाणं ; व्हिडिओ व्हायरल …