• Download App
    हिजाबचे समर्थन करीत राहुल गांधी म्हणतात, माँ सरस्वती ज्ञान देताना भेदभाव करीत नाही । Supporting the hijab, Rahul Gandhi says, "Mother Saraswati does not discriminate in imparting knowledge."

    हिजाबचे समर्थन करीत राहुल गांधी म्हणतात, माँ सरस्वती ज्ञान देताना भेदभाव करीत नाही

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मुस्लीम मुलींनी हिजाब पेहेरण्याचे समर्थन करताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यामध्ये सरस्वती देवीचा संदर्भ देऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे. Supporting the hijab, Rahul Gandhi says, “Mother Saraswati does not discriminate in imparting knowledge.”

    हिजाबचा मुद्दा काढून कर्नाटक सरकार मुलींच्या शिक्षणात बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, माँ सरस्वती ज्ञान देताना भेदभाव करीत नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. कर्नाटकातील उडुपी येथील एका कॉलेजमध्ये सहा मुली हिजाब पेहरून आल्या होत्या. त्यावर कॉलेजचे प्राचार्य रुद्रगौडा यांनी कॉलेज कँपसमध्ये हिजाब चालेल पण वर्गात हिजाब घालून बसता येणार नाही, असे सांगितले. त्यावर या मुली आणि त्यांचे पालक कोर्टात गेले आहेत. या मुद्द्यावर ८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.



    मात्र, यावरून कर्नाटकात राजकारण तापले आहे. कुंडापूरच्या भांडारकर कॉलेजमध्ये ४० विद्यार्थी भगवी उपरणे घालून आले. त्यावर कॉलेज प्रशासनाने आक्षेप घेतला नाही. पण काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. हिजाब घालणे हा मुस्लीम मुलींचा मौलिक अधिकार आहे. पण भगवी उपरणे घालून विद्यार्थी येतात हे भाजपचे जातीय राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली.

    आता या वादात राहुल गांधी यांनी उडी घेऊन वादग्रस्त ट्विट केले आहे. हिजाबचा मुद्दा काढून मुलींच्या शिक्षणात अडथळा आणला जात आहे. माँ सरस्वती सर्वांना ज्ञान देते. ज्ञान देताना ती भेदभाव करीत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी हिजाबचे समर्थन करताना सरस्वती देवीचा उल्लेख केल्याने सोशल मीडियात त्यावर संताप उसळला आहे. अनेक यूजर्स राहुल गांधींवर टीकास्र सोडताना दिसत आहेत..

    Supporting the hijab, Rahul Gandhi says, “Mother Saraswati does not discriminate in imparting knowledge.”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य