वृत्तसंस्था
बेंगळुरू : कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा देतेवेळी आपण समाधानी असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. येडियुरप्पा यांच्या मूळ गावी ग्रामस्थांनी बंद पाळून ही नाराजी व्यक्त केली आहे.Supporters of Caretaker Karnataka Chief Minister BS Yediyurappa at his hometown Shikaripura, in Shivamogga district shut down
शिवमोगा जिल्ह्यातील शिकारीपुर हे येडियुरप्पांचे मूळगाव आहे. तेथे आज ग्रामस्थांनी दुकाने, संस्था, कार्यालये बंद ठेवून आपली नाराजी व्यक्त केली. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला. काहींनी गावातल्या मुख्य रस्त्यावर छोटी मिरवणूक काढून येडीयुरप्पा यांना पाठिंबा व्यक्त केला.
येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्यापूर्वी ही अशाच प्रकारे त्यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले होते. येडियुरप्पा लिंगायत समाजाचे आहेत. त्या समाजाच्या 30 मठाधिपतींनी त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदासाठी आपले समर्थन दिले होते. परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला.
आता त्यांच्या जागी कर्नाटकात नव्या मुख्यमंत्र्याचा शोध सुरू असून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग हे केंद्रीय निरीक्षक म्हणून कर्नाटकमध्ये येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधीमंडळ नेत्याची निवड करण्यात येईल. हे विधिमंडळ नेते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
परंतु, त्याआधी मावळते मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या समर्थकांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शक्तिप्रदर्शन करून घेतले आहे. येडियुरप्पा यांच्या मूळ गावातला बंद हा त्याचाच एक भाग मानला जात आहे.
Supporters of Caretaker Karnataka Chief Minister BS Yediyurappa at his hometown Shikaripura, in Shivamogga district shut down
महत्त्वाच्या बातम्या
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर रोखण्याची गरज खासदार संभाजीराजेंकडून पुराची पाहणी
- माजी इस्रो शास्त्रज्ञांच्या फसवणूकप्रकरणी सुप्रीम कोर्टाने म्हटले – सीबीआयने एफआयआर नोंदवला, आदेशाची गरज नाही
- मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाबनंतर आता छत्तीसगड कॉंग्रेसमध्ये बेबनाव सुरू, भूपेश बघेल अडीच वर्षांचेच मुख्यमंत्री?
- Karnataka CM : येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकचा कारभारी कोण? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही 3 नावे