विशेष प्रतिनिधी
मुंबई : महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महापालिकेच्या रुग्णालयाला नुकतेच दोन अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात दिले आहेत. त्याचबरोबर सुमारे दोन कोटी रुपये किमतीची यंत्रसामग्रीदेखील बच्चन यांनी रुग्णालयास दिली आहे. गेल्या काही दिवसांत सुमारे ३० गरजू रुग्णांवर या अत्याधुनिक व्हेंटिलेटरच्या सहाय्याने प्रभावी उपचारही करण्यात आले.Superstar Amitabh Bacchan donates ventilator
बच्चन यांनी दिलेल्या या अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’चे वैशिष्ट्ये म्हणजे याद्वारे गरजू रुग्णांना १०० टक्क्यांपर्यंत प्राणवायू देण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर प्राणवायू दाब आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची सुविधाही असून नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधादेखील यात आहे.
बच्चन यांच्याद्वारे प्राप्त झालेले दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे संगणकीय प्रणाली आधारित अत्याधुनिक व अद्ययावत ‘व्हेंटिलेटर’ आहेत. ज्या रुग्णांची प्राणवायू पातळी खालावलेली आहे, अथवा ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी या ‘व्हेंटिलेटर’चा उपयोग केला जात आहे.
Superstar Amitabh Bacchan donates ventilator