प्रतिनिधी
जयपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे काँग्रेस जणांचे डेस्परेशन प्रचंड वाढत असून ते आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना खतम करण्याच्या बाता करू लागले आहेत. आधी काँग्रेसजन मोदींची कबर खोदण्याची बात करत होते, आता त्यांना थेट खतम करून अदानी – अंबानींना जेलमध्ये घालण्याच्या बाता करत आहेत.sukhjinder-singh-randhawa-on-narendra-modi-bjp-adani-hindenburg
राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. मोदी आणि अदानी विरोधातल्या आंदोलनात जयपुर मध्ये शेकडो काँग्रेसजन सहभागी झाले होते. त्यांच्यासमोर बोलताना रंधवा यांनी बेलगाम आरोप केले. आधी मोदीला खतम करा आणि देश वाचवा. काँग्रेसची राजवट आली की आदानी आणि अंबानी यांना जेलमध्ये टाका, असे बेछूट वक्तव्य रंधवा यांनी केले आहे.
अदानीला ईस्ट इंडिया कंपनी बनवून मोदी संपूर्ण देश अदानीला विकत आहेत. त्याला खतम केल्याशिवाय देश वाचणार नाही. काँग्रेसजनांनी एकमेकांशी लढण्यात वेळ घालवू नये. एकजूट करून पहिले मोदीला खतम केले पाहिजे. काँग्रेस कुठल्या व्यक्तीसाठी नाही, तर पक्षासाठी लढत असते. आपणही काँग्रेससाठी लढावे, असा उपदेश देखील रांधवा यांनी राजस्थानच्या काँग्रेसजनांना केला.
काँग्रेसने मोदींची बदनामी करून अनेकदा आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. मौत के सौदागर पासून कबर खोदण्यापर्यंत आणि आता थेट खतम करण्यापर्यंतच्या बाता काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केल्या आहेत. पण याचा राजकीय दुष्परिणाम काँग्रेसलाच सहन करावा लागला आहे. तरी देखील काँग्रेसजन मोदींना थेट टार्गेट करणे थांबवत नाहीत.
https://www.bhaskar.com/local/rajasthan/news/sukhjinder-singh-randhawa-on-narendra-modi-bjp-adani-hindenburg-row-131032925.html
त्यामुळेच स्वतः मोदींनी कर्नाटक मधल्या सभांमध्ये आणि अमित शाह यांनी केरळ मधल्या सभेमध्ये काँग्रेसजनांना परखड भाषेत सुनावले होते. तुम्ही जितके मोदींना बदनाम कराल, जितकी त्यांच्यावर चिखल फेक कराल तितके कमळ त्याच चिखलातून उगवेल, असे इशारे दोन्ही नेत्यांनी दिले आहेत. पण तरी देखील काँग्रेसजनांच्या मोदींना खतम करण्याच्या बाता संपत नाहीत, हेच आजच्या जयपूर मधल्या सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.
sukhjinder-singh-randhawa-on-narendra-modi-bjp-adani-hindenburg
महत्वाच्या बातम्या
- शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ व्हिडीओचा मास्टरमाईंड कलानगरमध्ये… – नितेश राणेंचा थेट आरोप!
- जुन्या पेन्शन संदर्भात सामाजिक सुरक्षित तोडगा काढण्यावर शिंदे-फडणवीस सरकारचा भर; नियोजित संप मागे घेण्याचे आवाहन
- जुन्या पेन्शनच्या मुद्द्याला राजकीय हवा; हा तर विरोधकांच्या अपयशाचा कबुलीनामा!!
- अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातील मशीद हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!