विशेष प्रतिनिधी
मुंबई : गुगल वर वारंवार सर्च केल्यानंतर त्याचा परिणाम अल्गोरिदम नुसार होत राहतो. पण एका युवकाला याचा वेगळाच अनुभव आला. मूळच्या राजस्थानच्या पण सध्या मालवणीत राहणाऱ्या एका युवकाने नैराश्यातून आत्महत्या कशी करायची, ते गुगलवर वारंवार शोधले. हे आंतरराष्ट्रीय पोलीस संस्था इंटरपोलच्या लक्षात आले. इंटरपोलच्या अधिकाऱ्यांनी ठाणे पोलिसांना संबंधित युवकाचा फोन नंबर आणि लोकेशन देऊन ई-मेल केला. पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब मालवणीतील पत्त्यावर जाऊन या युवकाचा जीव वाचविला. Suicide search on Google leads to mans rescue
या युवकाच्या आईला पोलिसांनी एका विशिष्ट अपराधात अटक करून तुरुंगात ठेवले आहे. तिला सोडवण्यासाठी या युवकाने गेली दोन वर्षे प्रयत्न चालविले. पण त्याला त्यात यश आले नाही. हा युवक बेरोजगार देखील आहे. त्यामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्येचा मार्ग गुगलवर शोधला. पण वारंवार तो मार्ग शोधल्याने तो अल्गोरिदम नुसार त्याच्या मोबाईलवर सतत येत राहिला. ही बाब आंतरराष्ट्रीय पोलीस संस्था इंटरपोलच्या लक्षात आली. तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित युवकाचा मोबाईल नंबर आणि लोकेशन व्यवस्थित ट्रेस केले आणि त्याचा ईमेल ठाणे पोलिसांना पाठविला.
ठाणे पोलिसांनी त्या ईमेलची ताबडतोब दाखल घेतली मालवणीत जाऊन त्या युवकाला शोधले. त्याचे काउन्सिलिंग केले आणि त्याला त्याच्या नातेवाईकांकडे पाठवून दिले. गुगलचा सततचा सर्च युवकाच्या जीवावर बेतला असता. पण पोलिसांनी योग्य वेळेत ॲक्शन घेतल्यामुळे युवकाचा जीव वाचला.
Suicide search on Google leads to mans rescue
महत्वाच्या बातम्या