• Download App
    Such prediction of the results: Stalin quietly attended the Labour Day event; but Mamata entered the EVM strongroom!! निकालाची "अशी" चाहूल : स्टालिन शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात; पण ममता घुसल्या EVM च्या स्ट्रॉंगरूम मध्ये!!

    निकालाची “अशी” चाहूल : स्टालिन शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात; पण ममता घुसल्या EVM च्या स्ट्रॉंगरूम मध्ये!!

    Stalin

    नाशिक : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभांच्या निवडणुकांचे मतदान संपताच त्यांच्या निकालांची “अशी” काही चाहूल लागली, की तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आज शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात सामील झाले, तर काल रात्रीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये घुसून जबरदस्त गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल नेमका कसा लागेल, याची राजकीय चुणूक काल आणि आज व्यवस्थित दिसली.Such” prediction of the results: Stalin quietly attended the Labour Day event; but Mamata entered the EVM strongroom!!

    – एक्झिट पोल बाहेर आल्यानंतर

    पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल बाहेर आले. या एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार तामिळनाडूमध्ये जबरदस्त संघर्ष असून सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाला देखील पुन्हा सरकार स्थापन करायची संधी असल्याचे दिसून आले, पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी निश्चितच हरणार.‌त्यांची तृणमूळ काँग्रेस डब्यात जाणार, असे बहुतांश एक्झिट पोलने उघडपणे सांगितले.



     

    – टोकाचा संघर्ष

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोन्ही नेत्यांनी तामिळनाडू पेक्षा पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा जबरदस्त जोर लावला होता. कोणत्याही स्थितीमध्ये पश्चिम बंगाल जिंकायचाच, असा चंगच यांनी बांधला होता. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष झाला. तोच संघर्ष मतदानानंतर सुद्धा कायम राहिला म्हणूनच ममता बॅनर्जी काल रात्री कोलकत्यामधल्या नेताजी स्टेडियम मध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या स्ट्रॉंगरूम मध्ये घुसल्या. तिथे त्यांनी तब्बल साडेतीन तास ठाण मांडून गोंधळ घातला. भाजप मतांची चोरी करतो आहे. गुजरात मधले लोक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या स्ट्रॉंगरूम मध्ये आणून मशीन मध्ये गडबड करण्यात येत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

    – ममतांचा गदारोळ, स्टालिन शांत

    मात्र, एकीकडे कोलकत्यात ममता बॅनर्जी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या स्ट्रॉंगरूम मध्ये घुसून तुफान गदारोळ करत असताना दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हे मात्र आज शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात सामील झाले. त्यांनी चेन्नईमध्ये कामगार दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी ४ मे रोजी तुम्हाला “गुड न्यूज” मिळेल. तुमच्या मनात असलेले सरकार सत्तेवर येईल. नवीन सरकार कामगारांच्या हिताचे निर्णय घेईल, असे सांगितले.

    पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या राजकीय वर्तणुकीतून विधानसभा निवडणुकांच्या निकालांची “अशी” चाहूल लागली.

    Such prediction of the results: Stalin quietly attended the Labour Day event; but Mamata entered the EVM strongroom!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुंबई – पुणे वाहतूक कोंडी अडकलेल्या नागरिकांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर सुप्रिया सुळेंना देखील सुनावले!!

    Rajnath : राजनाथ म्हणाले- ऑपरेशन सिंदूर स्वेच्छेने थांबवले; भारत आयटीचे केंद्र तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र

    पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंची सेफसाईड माघार; विधान परिषद उमेदवारीवरून संजय शिरसाटांचा टोला