• Download App
    Donald Trump भारत रशियाचे तेल घेऊन विकतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा आगपाखड; भारतावर ज्यादा टेरिफ लादायची पुन्हा धमकी!!

    भारत रशियाचे तेल घेऊन विकतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा आगपाखड; भारतावर ज्यादा टेरिफ लादायची पुन्हा धमकी!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा आगपाखड केली. भारतावर ज्यादा टेरिफ वाढवायची पुन्हा धमकी दिली.

    डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ अकाउंट वर भारताविरुद्ध पुन्हा आगपाखड केली. भारत रशियाकडून अजूनही तेल घेतोच आहे. पण नुसते तेल घेऊन तो थांबत नाही, तर तो रशियन तेलातून स्वतःचा जास्त फायदा उपटण्यासाठी ते तेल खुल्या बाजारात विकतोय. रशिया युक्रेन मधल्या मधल्या नागरिकांना मारतोय. पण भारताला त्यांची फिकीर नाही म्हणून मी भारतावर ज्यादा टेरिफ वाढवतो आहे, असे ट्रम्प यांनी ट्रूथ अकाउंट वर लिहिले.

    डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टेरिफ लावायची आधीच घोषणा केली होती. 1 ऑगस्ट पासून तो टेरिफ लागू करणार होते. पण नंतर अमेरिकेने ती तारीख पुढे ढकलली. याच दरम्यान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे तातडीने रशिया दौरा करणार असल्याची बातमी समोर आली.

    याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचे आज सायंकाळी ट्रुथ अकाउंट वर भारताला धमकी देणारे ट्विट आले. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातले टेरिफ वॉर वरचा मजला चढले.

    substantially raising the Tariff paid by India to the USA, says US President Donald Trump in a post on Truth Social.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Election Commission : ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आता उमेदवारांचे फोटो रंगीत होणार

    Modi @75 : रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!

    Jaish-e-Mohammed, : ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदचे कुटुंब मारले गेल्याची जैशची कबुली; सशस्त्र दहशतवाद्यांच्या रॅलीत कमांडरचे वक्तव्य