• Download App
    Ahmedabad अहमदाबाद विमान दुर्घटना- जीव वाचवण्यासाठी

    Ahmedabad : अहमदाबाद विमान दुर्घटना- जीव वाचवण्यासाठी जळत्या वसतिगृहातून विद्यार्थी मारत होते उड्या

    Ahmedabad

    अहमदाबाद विमान अपघातानंतर नवीन भयानक फोटो आले समोर


    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद: Ahmedabad  अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताशी संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील विद्यार्थी आगीपासून आपला जीव वाचवण्यासाठी गॅलरीतून उड्या मारताना दिसत आहेत.Ahmedabad

    हे विमान टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच रुग्णालयाच्या वसतिगृहाशी धडकले, ज्यामुळे भीषण आग लागली होती. त्याच वेळी वसतिगृहात अनेक विद्यार्थी उपस्थित होते. आग पाहून या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उड्या मारण्यास सुरुवात केली. यासंबंधीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



    या विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या भयानक विमान अपघातातून फक्त एक प्रवासी विश्वास कुमार रमेश वाचला. सोमवारी या अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये विमान जळत होते आणि धुराचे मोठे लोट उठताना दिसत होते. यादरम्यान विश्वासकुमार रमेश धुरातून बाहेर पडताना दिसला.

    विश्वासकुमारला पाहून तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले आणि कोणालाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. इतक्या भयानक अपघातातून कोणी कसे वाचू शकेल असा प्रश्न सर्वांना पडला. समोरच्या भीषण आगीतून कोणी कसे वाचू शकेल? अपघातानंतर, विश्वासकुमारला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

    Students were jumping from the burning hostel to save their lives

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये