वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज देशभरात विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे.अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आसाम मध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा, बिहार मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडू मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, महाराष्ट्रात आरोग्य मंत्री राजेश टोपे, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कर्नाटकात बसवराज बोम्मई, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, राजस्थान मध्ये अशोक गहलोत तसेच जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल मनोज सिन्हा, गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदींनी स्वतः उपस्थित राहून आपापल्या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. Students vaccination begins in India
देशभरात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना विद्यार्थ्यांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. ओमायक्रोनचा फैलाव जरी वेगाने होत असला तरी त्याची लक्षणे सौम्य आहेत आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वेगात आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
शाळा आणि महाविद्यालयाचा सुरू झाली आहेत. त्यामुळे तातडीने लॉकडाऊन लावून शाळा महाविद्यालये बंद करण्याची परिस्थिती येऊ नये, असे आमचे प्रयत्न आहेत असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी सांगितले. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लोग डाऊन विषयी प्रतिकूल मत व्यक्त केले असून लॉकडाऊनपेक्षा लसीकरण कार्यक्रमावर भर देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Students vaccination begins in India
महत्त्वाच्या बातम्या
- SAVITRIBAI PHULE : देशातील पहिल्या महिला शिक्षिकेचा जन्म – मुलींसाठी उघडल्या 18 शाळा- आयुष्यभर महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’
- पश्चिम बंगालसारखे कडक निर्बंध राज्यात लागू होण्याची शक्यता , विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा दिला सूचक इशारा
- मालमत्ता कर माफीबाबत दुजाभाव का ?मुंबईप्रमाणे अन्य शहरातील जनतेची अपेक्षा