Student credit card : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी तृणमूल कॉंग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वचन दिलेल्या स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेस मंजुरी दिली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती दिली. स्टुडंट क्रेडिट कार्डच्या मदतीने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकेल. Student credit card will be launched soon in West Bengal, loan up to 10 lakh will be available for Education
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी तृणमूल कॉंग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वचन दिलेल्या स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेस मंजुरी दिली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती दिली. स्टुडंट क्रेडिट कार्डच्या मदतीने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकेल.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “कॅबिनेटने स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेस मान्यता दिली आहे. दहा वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये वास्तव्यास असलेला कोणताही विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतो. पदवी, पदव्युत्तर पदवी, डॉक्टरेटसाठी आणि पोस्ट डॉक्टरल स्टडीसाठी कर्ज दिले जाईल.” राज्यात ही योजना 30 जूनपासून सुरू होणार आहे.
40 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 40 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत. त्या म्हणाल्या की, आता कोणालाही अभ्यासासाठी घर सोडावे लागणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनाही चिंता करण्याची गरज नाही. 10 लाखांपर्यंतच्या कर्जाची हमी राज्य सरकारची असेल. त्या म्हणाल्या की, राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे.
कर्ज परतफेडीसाठी 15 वर्षे
नोकरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना हे कर्ज फेडता येईल. नोकरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला कर्ज फेडण्यासाठी पंधरा वर्षे दिली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाल्या. हे कर्ज घेण्याची प्रक्रियादेखील सुलभ केली आहे. स्टुडंट क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो. तृणमूल कॉंग्रेसने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात या योजनेचा समावेश केला होता, आता ती लागू केली जात आहे.
Student credit card will be launched soon in West Bengal, loan up to 10 lakh will be available for Education
महत्त्वाच्या बातम्या
- Ravishankar Vs Twitter : एआर रहमानच्या या गाण्यामुळे झाले होते केंद्रीय मंत्र्यांचे अकाउंट लॉक, ट्विटरचे स्पष्टीकरण
- जेपी नड्डांनी ट्वीटरवर शेअर केले कार्यकर्त्याचे भावनिक पत्र, ‘मन की बात’विषयी व्यक्त केल्या भावना
- Corona Vaccine : भारतात जुलैपासून मिळू शकते सिंगल डोस Johnson & Johnson ची लस, एवढी असेल किंमत
- कर्जबुडव्या विजय मल्ल्याची संपत्ती ईडीने विकली, SBI कन्सॉर्टियमला मिळाले 5,800 कोटी रुपये
- भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले – संघर्ष कधी अन् संवाद कधी हे ज्याला कळतं तोच खरा नेता!