विशेष प्रतिनिधी
नाशिक : अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात देणगीची चोरी झाली. या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज अधिकृतपणे कठोर भूमिका जाहीर केली. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी एक निवेदन जारी करून राम मंदिरातील देणगी चोरांना कठोर शासन झाले पाहिजे, पण त्याचवेळी राम मंदिरातल्या चोरीचे निमित्त करून हिंदू विरोधी आणि देशविरोधी तत्त्वांनी हिंदू धर्माच्या आणि हिंदू समाजाच्या बदनामीचे केलेले षडयंत्र उधळून लावले पाहिजे, असे स्पष्ट केले.
अयोध्यातले श्रीराम जन्मभूमी मंदिर हे संपूर्ण हिंदू समाजाचे आस्था असलेले स्थान आहे. तिथे झालेली देणगीची चोरी अत्यंत दुर्दैवी आहे. त्या संदर्भात सरकारने कठोर कायदेशीर कारवाई करून दोषींना कठोरातील कठोर सजा द्यावी असेच संघाचे मत असल्याचे दत्तात्रय होसबळे यांनी स्पष्ट केले. हिंदू समाजाने धैर्य राखावे.
राम मंदिरातील चोरीचे निमित्त करून हिंदू विरोधी आणि देशविरोधी तत्वे हिंदू समाजाला आणि हिंदू धर्माला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत, तो त्यांचा डाव हिंदू समाजाने हाणून पाडावा, असे आवाहनही दत्तात्रय होसबळे यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी राम मंदिरातील सर्व व्यवस्था सुरळीत करण्यात येतील, अशी ग्वाही सुद्धा दिली.
– “त्या” तिघांची नावे नाही घेतली
मात्र या निवेदनात दत्तात्रय होसबळे यांनी चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांची नावे घेतली नाहीत. राम मंदिरातील चोरी प्रकरणात आढळलेल्या सर्व दोषींना कठोर कायदेशीर शिक्षा करावी, अशी संघाची भूमिका त्यांनी जाहीर केली.
Statement issued by Dattatreya Hosabale about Ram Mandir
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यावर काँग्रेसची ताकद वाढेल, की गटबाजी वाढेल??
- वारकऱ्यांच्या सेवेसाठी विकासाला वेग; देहूतील इंद्रायणीच्या घाटाचा कायापालट!!
- Ram Mandir : राममंदिर चोरी- आरोपी अविनाशच्या घरातून 20 लाख रुपये सापडले; 1000 डॉलर्सही जप्त करण्यात आले
- एकीकडे पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची “तहान”; दुसरीकडे भारतातच हल्ले करायचा ISI मॉड्यूलचा पर्दाफाश!!