वृत्तसंस्था
नवी दिल्ली : न्यूझीलंड, इंग्लंडनंतर श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानचे पुन्हा हसे झाले आहे. Sri Lanka cricket tour canceled after New Zealand, England; big blow to Pakistan at the global level
श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाचा दौरा १५ ऑक्टोबरला होणार होता. पण, आता दौऱ्यावर जाणार नसल्याची घोषणा श्रीलंकन क्रिकेट कंट्रोल बोर्डाने केली. त्यामुळे पाकिस्तानला झटका बसला आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांच्या संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात आल्यानंतर सामना सुरु होण्यापूर्वी काही तास परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडनंही दौरा रद्द केला. या दोन धक्क्यातून सावरण्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक फटका बसला आहे.
पाकिस्तानचा हा दौरा अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. श्रीलंका महिला संघाचा हेड कोच हसन तिलकरत्ने याने ही घोषणा केली. श्रीलंका संघ १५ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानात रवाना होणार होती, पण, हा दौरा होणार नसल्याचं तिलरत्नेनं सांगितलं.
Sri Lanka cricket tour canceled after New Zealand, England; big blow to Pakistan at the global level
महत्त्वाच्या बातम्या
- Cruise Drugs Case : आर्यनसह 8 जणांना जेल की बेल यावर आज निर्णय, आतापर्यंत 17 जणांना अटक
- मुंबईतील मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची मागणी
- रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप ; म्हणाल्या- ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला पाहिजे “
- Earthquake In Pakistan : रिश्टर स्केलवर 6.0 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला पाकिस्तान, 20 जण ठार, 300 हून अधिक जखमी