• Download App
    श्रीलंका आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला घरघर; चीनकडून विविध कर्ज घेतल्याचा विपरीत परिणाम । Sri Lanka and Pakistan's economy in crisis

    श्रीलंका आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला घरघर; चीनकडून विविध कर्ज घेतल्याचा विपरीत परिणाम

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : श्रीलंका आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. विकास योजना आणि संरक्षण योजनांसाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्यामुळे हे देश आर्थिक संकटात सापडले आहेत. Sri Lanka and Pakistan’s economy in crisis

    श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या चलनाचे अवमूल्यन सुरू आहे. श्रीलंकेचा एक रुपया म्हणजे भारताचे २७ पैसे आणि पाकिस्तानचा एक रुपया म्हणजे भारताचे ४२ पैसे अशी स्थिती आहे. श्रीलंकेतील महागाईचा दर १६ टक्क्यांवर तर पाकिस्तानचा महागाईचा दर १२ टक्क्यांवर आहे. श्रीलंकेचा परकीय चलनसाठा फेब्रुवारी २०२२ अखेर २.३ अब्ज डॉलर एवढाच उरला तर पाकिस्तानचा परकीय चलनसाठा २२.२८ अब्ज डॉलर एवढा आहे.



    परकीय चलनसाठा वेगाने घटत आहे आणि महागाई सातत्याने वाढत आहे. यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणे कठीण झाले आहे. दोन्ही देशांना तेल, औषधे, धान्य अशा अनेक अत्यावश्यक गोष्टींची आयात करणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे.

    Sri Lanka and Pakistan’s economy in crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार