• Download App
    INDIA आघाडीत फूट? जागावाटप झालेले नसताना केजरीवालांकडून उमेदवाराची घोषणा split in the front INDIA Announcement of candidate by Kejriwal without allotment of seats

    INDIA आघाडीत फूट? जागावाटप झालेले नसताना केजरीवालांकडून उमेदवाराची घोषणा

    याआधी जेडीयूने अरुणाचल प्रदेशमधूनही आपला एक उमेदवार जाहीर केला होता. split in the front INDIA Announcement of candidate by Kejriwal without allotment of seats

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: लोकसभा निवडणुक 2024 साठी विरोधी पक्षांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांदरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील भरूच मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

    गुजरातमधील डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार चैत्रा वसावा भरूचमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी नेत्रंग येथील एका जाहीर सभेत केली.



    चैत्रा वसावा हे सध्या वनविभागाशी संबंधित एका गुन्ह्यात तुरुंगात आहे. याआधी जेडीयूने अरुणाचल प्रदेशमधूनही आपला एक उमेदवार जाहीर केला होता.

    सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आदिवासी समाजाचे नेते चैत्रा वसावा यांना भाजपने अटक केली आहे. ते आमच्या धाकट्या भावासारखे आहेत. पण सर्वात दुःखाची बाब म्हणजे त्यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली. शकुंतला बेन चैत्र वसावा यांची पत्नी असली तरी ती आमच्या समाजाची सून आहे. ही संपूर्ण आदिवासी समाजाचा अवमान करणारी बाब आहे. असं ते म्हणाले.

    split in the front INDIA Announcement of candidate by Kejriwal without allotment of seats

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!