बैठकींच्या माध्यमातून होतात अनेक समाज उपयोगी कार्य
विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने नुकतच सन्मानित करण्यात आलं. खारघरं येथे पार पडलेल्या या सोहळ्यासाठी तब्बल वीस लाखाहून अधिक श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. अगदी रणरणत्या उन्हात हे श्री सदस्य कसली परवा न करता हा सोहळा पाहण्यासाठी बसून होते, किंबहुना काही सदस्य तर आदल्या रात्रीपासून त्या मैदानावर उपस्थित होते. हे पाहून अनेकांना श्री सदस्यांबद्दल आणि त्यांच्या बैठकीबद्दल जाणून घ्यायची इच्छा झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपण त्याबाबत थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.Spiritual Guru Shri AappaSaheb Dharmadhikari Awarded By Maharashtra Bhushan.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारा हा श्री परिवार आज ५० लाखांपेक्षाही जास्त आहे आणि ही सगळी मंडळी जोडल्या गेली ती त्यांच्या विशेष बैठकीच्या माध्यमातून. श्री परिवारात बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या बैठकीचा पाया ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी यांनी घातला.. नानासाहेबांनी ८ ऑक्टोबर १९४३ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक समितीची स्थापना केली आणि या समाजकार्याचा पाया रोवला गेला. या समितीच्या माध्यमातून श्री सेवकांसाठी बैठकीचे आयोजन केल्या जाऊ लागलं.
मुंबईतील गोरेगाव येथे पहिल्यांदा बैठकीचे आयोजन केलं गेलं आणि तिथून बैठकीचा वटवृक्ष बहरायला सुरुवात झाली. या बैठकीच्या माध्यमातून श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोध या ग्रंथाचं निरूपण साध्या आणि सोप्या भाषेत केल्या जाऊ लागलं. मानव जातीसाठी आवश्यक असणारे चार पुरुषार्थ धर्म, अर्थ ,काम, मोक्ष याचेही मार्गदर्शन या निरूपणामधून केल्या जाऊ लागलं.
मात्र केवळ आध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक कार्यालाही या बैठकातून हातभार लावला जाऊ लागला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदस्य संस्कार वर्ग, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक उपक्रम या समितीच्या आणि श्री सदस्यांच्या माध्यमातून राबवले जाऊ लागले. या सगळ्यांमध्ये श्री सदस्यांची शिस्त सगळ्यांसाठीच आश्चर्याचा विषय ठरला.
२००८ मध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला. त्यावेळीही प्रचंड संख्येने अधिक श्री सदस्य उपस्थित होते. अगदी या संख्येने विक्रमही नोंदवला होता. त्यावेळी कुठलीही गडबड गोंधळ न करता सोहळा अतिशय उत्तम प्रकारे पार पडला आणि उपस्थित श्री सदस्यांनी सगळं मैदान स्वच्छ केलं. सगळ्यांनाच त्यांच्या या कृतीचा कौतुक वाटलं. यासारखे अनेक दाखले श्री सदस्यांबाबत अनेक जण देत असतात. केवळ भारतात नाही तर भारताबाहेरही या श्री सदस्यांच्या बैठका मोठ्या प्रमाणावर सुरू असून.अध्यात्माच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य या श्री सेवकांच्या हातून होत असतं.
Spiritual Guru Shri AappaSaheb Dharmadhikari Awarded By Maharashtra Bhushan.
महत्वाच्या बातम्या
- ओलांडली चीनची लोकसंख्या; भारतात वाजली धोक्याची घंटा; पण भारतात कुणाची लोकसंख्या वाढतीय??
- Karnataka Election : भाजपाने जाहीर केली ४० स्टार प्रचारकांची यादी; पंतप्रधान मोदी, अमित शाह, नड्डा, राजनाथ सिंह यांची नावं आघाडीवर!
- माफिया अतिक अहमदचा खास शूटर असद कालियाला अटक, ५० हजारांचा होता इनाम!
- WATCH : केजरीवालांनी स्वत:चे गुरू अण्णा हजारेंची रुग्णालयात हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, कपिल मिश्रा यांचा खळबळजनक आरोप