वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध इंडिया आघाडीचे नेते निवडणुकीची कसून तयारी करत असताना मोदी सरकारने धक्का तंत्र वापरत 18 ते 22 सप्टेंबर असे 5 दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे या अचानक बोलावलेल्या विशेष अधिवेशनात नेमकी काय चर्चा होईल??, याविषयी तर्क वितरकांना उधाण आले आहे. Special Session of Parliament from 18 to 22 September
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून अमृतकालात 18 ते 22 सप्टेंबर असे 5 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवल्याची माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी या ट्विटमध्ये बाकीचे तपशील दिलेले नाहीत. त्यामुळे राजकीय तर्क वितर्कांना जोरदार उधाण आले आहे.
एकीकडे “इंडिया” आघाडीतल्या सर्व विरोधकांनी मोदी सरकारच्या दिशेने आपल्या तोफा वळविल्या आहेत. अदानी पासून दुष्काळापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांची हत्यारे सर्व विरोधक परजत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार या विशेष अधिवेशनात नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणणार आणि आपल्याला हवा तसा अजेंडा सेट करणार??, या विषयांवर तर्क वितर्क सुरू झाले आहेत.
या विशेष अधिवेशनात समान नागरी कायदा अथवा अन्य कोणता वादग्रस्त विषय चर्चेला आणणार का की अन्य कोणत्या विषयांमध्ये सरकार विरोधकांना धक्का देणार??, याविषयी राजधानीत चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
Special Session of Parliament from 18 to 22 September
महत्वाच्या बातम्या
- विरोधी आघाडी I.N.D.I.A.ची आज मुंबईत तिसरी बैठक, जवळपास २८ पक्षांची जमवाजमव केल्याचा दावा
- मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे गंभीर आरोप, न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार; वकील जे लिहून नेतात, तोच निकाल येतो!!
- पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघांची घोषणा
- ‘मोदींशी लढण्याआधी आपापसातील भांडणं मिटवा…’ मुख्तार अब्बास नक्वींचा I.N.D.I.A आघाडीवर टोला