• Download App
    मोदींनी राज्यसभेतील भाषणात सावरकर - हृदयनाथ मंगेशकरांचा केला उल्लेख!! अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या कथित भोक्त्यांवर प्रखर हल्ला!!Speaking in the Rajya Sabha pm narendra modi about savarkar and mangeshkar

    मोदींनी राज्यसभेतील भाषणात सावरकर – हृदयनाथ मंगेशकरांचा केला उल्लेख!! अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या कथित भोक्त्यांवर प्रखर हल्ला!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेस वरील हल्ला आज राज्यसभेतही पुढे चालू ठेवला. काँग्रेसच्या कृष्ण कृत्यांचा उल्लेख करताना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य संदर्भात आपल्या सरकारला सुनावणाऱ्या अनेक बाबींचा उल्लेख करून अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भोक्त्यांना प्रत्युत्तर दिले.Speaking in the Rajya Sabha pm narendra modi about savarkar and mangeshkar

    पंतप्रधान मोदी म्हणाले, की आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाषणे देणाऱ्या काँग्रेसच्या आणि त्यांच्या इकोसिस्टीम भच्या कृष्ण कृत्यांवर मी आज प्रकाश टाकतो. गोव्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी सत्याग्रहींना असाह्य सोडले इतकेच नव्हे, तर गोव्याचे सुपुत्र आणि लता मंगेशकर यांचे सर्वात धाकटे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओ मधून नोकरीवरून काढून टाकले होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यपंक्तींना संगीत दिले हा त्यांचा “गुन्हा” होता. हे स्वतः हृदयनाथ मंगेशकर यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

    ही मुलाखत आज उपलब्ध आहे. काव्याला संगीत देण्यासाठी परवानगी मागण्यासाठी ते सावरकरांकडे गेले होते. त्यावेळी सावरकरांनी देखील त्यांना विचारले होते माझ्या काव्यपंक्तींनी संगीत देतोयस तुला तुरुंगात जायचे आहे का?, तरी देखील हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांच्या प्रसिद्ध काव्याला संगीत दिले आणि अक्षरशः त्या “गुन्ह्याबद्दल” त्यांना आठ दिवसांच्या आत ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीतून कमी करण्यात आले. ही काँग्रेसच्या राजवटीत आली अभिव्यक्ती स्वातंत्र्यची अवस्था होती.

    इतकेच नाही तर मजरूह सुलतानपुरी यांच्यासारख्या प्रसिद्ध गीतकाराला देखील काँग्रेसच्या सरकारने तुरुंगाची हवा खायला लावली होती. किशोर कुमार यांना आणीबाणीच्या काळात त्रास देण्यात आला होता. एवढ्या प्रसिद्ध व्यक्तींना काँग्रेसच्या सरकारांनी त्रास दिला आणि त्याच काँग्रेसचे नेते आणि त्यांची इकोसिस्टीम आज आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाषणे देत फिरत आहे, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.

    Speaking in the Rajya Sabha pm narendra modi about savarkar and mangeshkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य