वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकसभेत पेगासस आणि कृषी विधेयके या विषयांवर विरोधकांनी सलग दोन आठवडे घातलेल्या गोंधळाविषयी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.Speaker Om Birla’s displeasure over the chaos in the Lok Sabha; “Mirror” shows the best work of the last two years; 122% working !!
त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना त्यांनी गेल्या दोन वर्षातला त्यांच्याच कामगिरीचा आरसा समोर ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये लोकसभेने आपली कामगिरी उंचावत तब्बल 122 % कामकाज पूर्ण केले होते, याची आठवण ओम बिर्ला यांनी करून दिली.
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, अन्य पक्षांचे लोकसभेतील नेते आदींनी सभापती ओम बिर्ला यांच्या दालनात त्यांची भेट घेतली. या नेत्यांच्या भेटीच्या वेळी ओम बिर्ला यांनी पावसाळी अधिवेशनात असमाधानकारक कामकाज झाल्याचे परखड बोल या नेत्यांना ऐकविले.
सभापती या नात्याने सातत्याने आपण सभागृहात शांतता आणि चर्चेसाठी प्रोत्साहन दिले. कोणत्याही चर्चेला वगळले नाही. याकडे त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांचेही लक्ष वेधले. 2019 आणि 2020 या दोन वर्षांमध्ये चार अधिवेशनांमध्ये लोकसभेने 122 % कामकाज केले. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचीही कामगिरी अतिशय वाखाणण्याजोगी आहे
असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु 2019 च्या पावसाळी अधिवेशनात मात्र त्याच्या विपरीत लोकसभेचे कामकाज खुप खालावले. सततच्या गोंधळाने सदनाची गरिमा ढासळली हे योग्य नसल्याचे परखड बोल त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना ऐकवले.
सत्ताधारी आणि आणि विरोधी पक्ष्यांच्या नेत्यांनी आपापल्या सदस्यांवर वचक ठेवला पाहिजे. सदनात त्यांनी शिस्तबद्ध वर्तणूक ठेवण्याचे त्यांना बजावले पाहिजे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांचे हे काम आहे. मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. पुढच्या अधिवेशनात याचे सकारात्मक परिणाम दिसतील, अशी आशा ओम बिर्ला यांनी व्यक्त केली.
Speaker Om Birla’s displeasure over the chaos in the Lok Sabha; “Mirror” shows the best work of the last two years; 122% working !!
महत्त्वाच्या बातम्या
- नाना पटोलेंकडून राहुल गांधींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, “राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?”
- संसदेतील विरोधकांच्या गोंधळावर भावुक झाले व्यंकय्या नायडू, म्हणाले- राज्यसभेचे पावित्र्य गेले; गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईची शक्यता
- “दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत” वडेट्टीवारांचा सणसणीत टोला
- आता एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांनाही होणार दंड, रिझर्व्ह बँकेने दिले हे निर्देश