वृत्तसंस्था
डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपदी पुष्करसिंह धामी यांची निवड करण्यात आली असून ते बुधवारी पदाची शपथ घेणार आहे. उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीत धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमत प्राप्त केले होते. ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनत आहेत. सोमवारी झालेल्या विधिमंडळाच्या बैठकीत त्यांची एकमताने नेतेपदी निवड झाली होती. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी पक्ष निरीक्षक म्हणून काम पाहिले. Sources of Uttarakhand to Pushkar Singh Dhami; Preparations for the swearing-in ceremony with the ministers on Wednesday
डेहराडून येथील परेड मैदानावर ते अन्य सहकाऱ्यांसमावेत बुधवारी दुपारी ३.३० वाजता शपथ घेणार आहेत. कुमाऊ या पर्वतीय क्षेत्राचे ते प्रतिनिधीत्व करत असून ते १३ वे मुख्यमंत्री म्हणून आता काम पाहणार आहेत. भाजपने निवडणुकीत ७० पैकी ४७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते.
Sources of Uttarakhand to Pushkar Singh Dhami; Preparations for the swearing-in ceremony with the ministers on Wednesday
महत्त्वाच्या बातम्या
- Shivsena – NCP Feud : शिवसेना खासदार श्रीरंग बारणे भडकले; मावळ राष्ट्रवादीला सोडणार नाही म्हणाले!!
- Gulam Nabi Azad : जातीवादाच्या अतिरेकामुळे चांगल्या नेत्यांना प्रचारात संधी नाही; गुलाम नबी आझादांची स्पष्टोक्ती
- योगासने, मसाले व तेलविरहित भोजन हेच १२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य
- हायटेक बोगदा दिल्लीकरांसाठी तयार ३० मिनिटांचा प्रवास पाच मिनिटांत शक्य
- म्हणून कॉँग्रेसच्या काळात वाढला होता भ्रष्टाचार, ईडी ठेवली होती नावालाच