• Download App
    भारतात फ्लेक्स-इंधन वाहनांचे लवकरच उत्पादन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सूतोवाच । Soon production of flex-fuel vehicles in India; Union Minister Nitin Gadkari

    भारतात फ्लेक्स-इंधन वाहनांचे लवकरच उत्पादन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सूतोवाच

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सहा महिन्यांत फ्लेक्स-इंधन वाहनांचे उत्पादन सुरू होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना याबाबतचे आश्वासन दिले आहे. ‘ईटी ग्लोबल बिझनेस समिट’ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना, गडकरी म्हणाले की, सरकार १०० % स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांपासून सार्वजनिक वाहतूक चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. ते म्हणाले की, या आठवड्यात मी सर्व मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि सियामच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. एकापेक्षा जास्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिनचे उत्पादन सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. Soon production of flex-fuel vehicles in India; Union Minister Nitin Gadkari



    फ्लॅक्स-इंधन हे गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणापासून तयार केलेले पर्यायी इंधन आहे. ते म्हणाले की टिव्हीएस मोटर आणि बजाज ऑटो सारख्या कंपन्यांनी आधीच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करण्यास सुरुवात केली आहे.

    फ्लेक्स इंधन वाहने काय आहेत?

    फ्लेक्स फ्युएल इंजिन हे अंतर्गत ज्वलन इंजिन आहे जे एकापेक्षा अधिक प्रकारच्या इंधनावर चालू शकते आणि हवे असल्यास ते मिश्रित इंधनावरही चालवता येते. यामध्ये पेट्रोलसोबत इथेनॉल आणि मिथेनॉलचे मिश्रण वापरले जाऊ शकते. फ्लेक्स इंधन खर्च कमी करते. त्याचबरोबर अशा इंधनावर चालणारी वाहने कमी प्रदूषण पसरवतात. अशा परिस्थितीत सर्व वाहन कंपन्यांनी हा उपक्रम सुरू करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे.

    Soon production of flex-fuel vehicles in India; Union Minister Nitin Gadkari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!