विशेष प्रतिनिधी
चंदीगड: चित्रपट अभिनेता सोनू सूद याच्या बहिणीला कॉँग्रेसने उमेदवारी तर दिली पण त्यामुळे पक्षात गृहकलह उफाळून आला आहे. मोगा या मतदारसंघातील कॉँग्रेसच्या विद्यमान आमदाराने पक्षाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे.Sonu Sood’s sister’s candidature sparks strife in Congress, Sitting MLA joins BJP
कॉँग्रेसने ८६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका सूद हिलाही तिकीट देण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे पक्षात असंतोष आहे. मोगा येथील विद्यमान आमदार डॉ. हरज्योत कमल यांनी काँग्रेसकडून डावलण्यात आल्याच्या नाराजीतून त्यांनी पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मालविका सूद हिने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू आणि मुख्यमंत्री चरणसिंग चन्नी यांनी सोनू सूद याची मोगा येथे जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर तिथेच मालविकाच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते .
मोगामधून मालविका सूद हिची उमेदवारी जाहीर झाल्यावर काही तासांतच स्थानिक आमदार हरज्योत यांनी काँग्रेसला रामराम ठोकला व भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंद्रसिंह शेखावत यांनी हरज्योत यांचे पक्षात स्वागत केले.
हरज्योत कमल यांच्या भाजप प्रवेशाने अधिक आनंद झाला आहे. यामुळे मोगा मतदारसंघात भाजपचा जनाधार वाढणार आहे. त्यांच्या नावातच कमल आहे ही अधिक जमेची बाजू आहे, असे यावेळी शेखावत म्हणाले.
Sonu Sood’s sister’s candidature sparks strife in Congress, Sitting MLA joins BJP
महत्त्वाच्या बातम्या
- मित्रांनीच वाढविली अखिलेश यादव यांची डोकेदुखी, जागावाटपाचा फैैसला होईना
- पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरने केली पाच कोटी रुपयांची संपत्ती दान
- शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दर वेळेला पवारांची “उंची” का सांगावी लागते??
- पवारांची उंची आणि राष्ट्रीय राजकारणाचे स्थान लक्षात घेऊन नव्या पिढीने बोलावे; फडणवीसांना अजितदादांचे प्रत्युत्तर!!