विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसी करणी : नेहरू – इंदिरा काळात प्रादेशिक अस्मिता दुखावल्या, पण सोनिया काळात त्याच पेटवतायेत!!, असे चित्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अखेरीस निर्माण झाले आहे. सोनिया गांधींनी कर्नाटकात काँग्रेसच्या प्रचारात भाग घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या भाषणाचे जे ट्विट केले आहे, त्यातून काँग्रेसचा कन्नड प्रादेशिक अस्मिता फुलविण्याचा नव्हे, तर पेटवण्याचा प्रकार समोर आला आहे.Sonia Gandhi sowing the separatists seeds in karnataka as indira did in Punjab
सोनियांनी कर्नाटकला “सार्वभौम राज्य” म्हटले आहे आणि त्यातच कर्नाटकात त्यांनी पेरलेल्या प्रादेशिक फुटीची बीजे आहेत. राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या भाषणांमध्ये भारताला “इंडिया द युनियन ऑफ स्टेट्स” असे म्हटले होते. हा देखील भारतात प्रादेशिक अस्मिता नव्हे, तर फुटीरतावाद पेटवण्याचा वेगळा प्रकार होता. सोनियांनी त्या पुढे जाऊन कर्नाटकला “सार्वभौम राज्य” म्हणणे हे थेट फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे!!
पण काँग्रेसची ही करणी आजची नाही. नेहरू – इंदिरा काळात याच काँग्रेसने प्रादेशिक अस्मिता दुखावल्या होत्या. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या भाषिक राज्यांची निर्मिती करण्यास काँग्रेसने नेहरू काळात प्रचंड विरोध केला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ पूर्णपणे दडपून टाकण्यासाठी काँग्रेसचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्राचे 105 बळी घेतले होते, इतकेच नाहीतर स्वतः पंडित नेहरूंची हिंमत तर छत्रपती शिवाजी महाराजांना “वाट चुकलेला देशभक्त” म्हणण्याइतपत निर्ढावली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे वाटत होते.
पण प्रादेशिक अस्मितेच्या देशभक्त ओंकार आणि अखेर नेहरुंचा पराभव केला होता. त्यांना संयुक्त महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या भाषक राज्यांची निर्मिती करावी लागली होती.
इंदिराजी आपल्या राजवटीत नेहरूंपेक्षा पुढे गेल्या. त्यांनी खेळातले पत्ते पिसावेत तसे वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री बदलून तिथल्या प्रादेशिक अस्मितांचा आणि नेत्यांना दुखावून ठेवले आणि तेथूनच पंजाब सारख्या राज्यात फुटीरतावाद कायमचा फैलावला.
आज सोनिया गांधी इंदिराजांच्या पावलावर पाऊल टाकून दक्षिणेकडच्या कर्नाटक राज्यात सार्वभौमत्वाच्या नावाखाली फुटीरतेची बीजे पेरत आहेत.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या ट्विटला दिलेले उत्तर चपखल आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला तुकडे तुकडे गँगने घेरले आहे, असे खोचक शरसंधान मोदींनी केले आहे.
राहुल गांधी जेव्हा सार्वभौम भारताला “युनियन ऑफ स्टेट्स” म्हणाले, तेव्हा त्यांनी लंडनमध्ये जाऊन भारतातल्या फुटीची विशेष पेरली. त्यांच्या आईने त्या पलीकडे जाऊन कर्नाटकात सार्वभौमत्वाच्याच नावाखाली फुटीची बीजेच पेरली आहेत. याचा अर्थ आता इतिहासाने असे वेगळे वळण घेतले आहे, की एकेकाळी प्रादेशिक अस्मिता दुखावणारी काँग्रेस आता प्रादेशिक अस्मिता फुलवायला नाही तर पेटवायला निघाली आहे!!… काँग्रेसला प्रादेशिक अस्मिता टिकवून देशाचे सार्वभौमत्व वर्धिष्णू करण्याचा समन्वय साधता येत नाही हेच खरे!!
Sonia Gandhi sowing the separatists seeds in karnataka as indira did in Punjab
महत्वाच्या बातम्या
- 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, याचिकाकर्त्याने म्हटले- राहुल यांना शिक्षा सुनावणाऱ्या जजचाही समावेश
- ‘द केरला स्टोरी’ तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार नाही, मल्टिप्लेक्स संघटनेचा निर्णय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दिला हवाला
- केरळमध्ये हाऊसबोट बुडाल्याने 21 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख, मृतांच्या वारसांना मदत जाहीर
- 2024 प्रजासत्ताक दिन संचलनात फक्त महिला सैनिक, अधिकारी, बँड आणि चित्ररथ हवेत; संरक्षण मंत्रालयाची ऐतिहासिक सूचना