विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात येत्या २४ तासांत अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कमाल तापमान ४० आणि किमान तापमान २० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते. नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान वाऱ्यांमुळे उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. परंतु, तिसऱ्या दिवशी पुन्हा उष्णतेचा प्रकोप वाढून उष्णतेची लाट नोंदवली जाणार आहे. Some relief tomorrow due to strong winds in North India
दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात आज तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सियस राहू शकेल. सूर्यास्ताची वेळ: सकाळी ६:३८, सूर्योदयाची वेळ: सकाळी ६:११ – दिवसभर हवामान स्वच्छ राहील, कडक सूर्यप्रकाश असेल.
दरम्यान, बदलत्या हवामानामुळे सध्या संपूर्ण उत्तर भारतातील बहुतांश राज्ये उष्णतेच्या लाटेत होरपळत आहेत. बुधवार हा १९५१ नंतरचा सर्वात उष्ण दिवस ठरला. दिवसभर उष्ण वारे वाहत होते. कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअसवर सामान्य तापमानापेक्षा आठने अधिक राहिले.
यापूर्वी २०२१ मध्ये ४०.१ आणि १९७३ मध्ये ३९.६ अंश सेल्सिअस पारा नोंदवला गेला होता. येत्या २४ तासांत उष्णतेची लाट आणि उष्णतेपासून थोडाही दिलासा मिळण्याची आशा हवामान खात्याने व्यक्त केलेली नाही.
१९५१ मध्ये नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बुधवार हा गेल्या ७१ वर्षांतील सर्वात उष्ण दिवस ठरला. गेल्या १०० वर्षांचा विचार केला तर, १९४५ मध्ये, सर्वाधिक पारा ४०.६ अंश सेल्सिअस नोंदवला गेला होता.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिल्लीचे किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा एक जास्त होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण १७ ते ७८ टक्के नोंदवले गेले आहे. दिवसभर सूर्यप्रकाश होता आणि उष्ण वाऱ्यांची नोंद झाली. याशिवाय नरेला हे ४१.७ अंश सेल्सिअससह दिल्लीचे सर्वात उष्ण क्षेत्र होते. त्याच वेळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ४१.५ अंश सेल्सिअस, पीतमपुरामध्ये ४१.४ आया नगरमध्ये ४०.३ , रिजमध्ये ४०.९ लोधी रोडमध्ये ४०.१आणि नजफगडमध्ये ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Some relief tomorrow due to strong winds in North India
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिकेत पोलखोल अभियान राबवून भाजप काढणार शिवसेनेचे वाभाडे
- Weather Update : राज्यात पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट, मराठवाडा-विदर्भासह उत्तर-मध्य महाराष्ट्र तापणार, IMDचा सावधगिरीचा इशारा
- Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मिरात कधी होणार निवडणुका? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिले उत्तर, वाचा सविस्तर…
- Axis-City Bank Deal : ऑक्सिस बँक भारतातील सिटी बँकेचा व्यवसाय सांभाळणार, १.६ अब्ज डॉलरमध्ये झाला करार