• Download App
    भाजप फुटीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांची सामाजिक समरसता; गोरखपूरमध्ये खिचडी प्रसाद ग्रहण!! Social harmony of Yogi Adityanath against the backdrop of BJP split

    भाजप फुटीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांची सामाजिक समरसता; गोरखपूरमध्ये खिचडी प्रसाद ग्रहण!!

    प्रतिनिधी

    लखनऊ : एकीकडे एकापाठोपाठ एक मंत्री आमदार राजीनामा देत असल्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला गळती लागली आहे. हे सर्व मंत्री आणि आमदार भाजपवर ओबीसी, दलित, पिछडावर्ग यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप करून पक्षाबाहेर पडत आहेत.Social harmony of Yogi Adityanath against the backdrop of BJP split

    या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सामाजिक समरसतेचा संदेश देत एक उपक्रम केला. गोरखपूर मधील झुंगिया येथे अमृतलाल भारती यांच्या निवासस्थानी जाऊन योगी आदित्यनाथ यांनी मकर संक्रांतीचा खिचडी प्रसाद ग्रहण केला. या संदर्भातले छायाचित्र योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहे.

    मकर संक्रमण पर्वात सामाजिक समरसतेचा संदेश आहेच. आज गोरखपूर येथील झुंगिया येथे अमृतलाल भारती यांच्या निवासस्थानी खिचडी प्रसाद ग्रहण करण्याचा योग आला. अमृतलाल यांचे मनःपूर्वक आभार, असे ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

    भाजप मध्ये फुट पडण्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ हे दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. दोन दिवसांत बहुतेक काळ ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पक्षांतर्गत बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवत होते. उत्तर प्रदेशात गोरखपूर मध्ये परतल्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी राजकीय विधान करण्यापेक्षा त्यांनी आपल्या कृतीतून सामाजिक समरसतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

    Social harmony of Yogi Adityanath against the backdrop of BJP split

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी