गांधी कुटुंबियाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये माजी अध्यक्ष राहूल गांधी यांचा पराभव भाजप नेत्या स्मृति इराणी यांनी केला होता. यामुळे राहूल गांधी यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता स्मृति इराणी यांनी आणखी एक पाऊल उचलले आहे. त्यामुळे कॉँग्रेसला धडकी भरली आहे. Smriti Irani’s move came as a shock to the Congress
विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुरम : गांधी कुटुंबियाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये माजी अध्यक्ष राहूल गांधी यांचा पराभव भाजप नेत्या स्मृति इराणी यांनी केला होता. यामुळे राहूल गांधी यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता स्मृति इराणी यांनी आणखी एक पाऊल उचलले आहे. त्यामुळे कॉँग्रेसला धडकी भरली आहे.
एकीकडे राहुल पार्टी करण्यात मश्गूल असताना त्यांच्या वायनाड मतदारसंघात केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी दौºयावर आहेत. राहुल गांधी यांच्या मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेण्याचा त्यांचा उद्देश आहे.
स्मृती यांचा दौरा दोन दिवसांचा आहे. अलीकडेच राहुल नेपाळमध्ये एका पार्टीत रमल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात शब्दयुद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. केंद्राच्या आकांक्षी जिल्हा योजनेच्या अंमलबजावणीचा त्या आढावा घेणार आहेत. भाजपला अनेक राज्यांत सत्ता मिळविता आली असली तरी केरळमध्ये स्थिरावता आलेले नाही. स्थानिक नेत्यांना सामावून राजकारणात जम बसविण्याचे त्यांचे प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. अशावेळी स्मृती इराणी यांच्या रूपाने केंद्रातील एक लोकप्रिय नेत्याला पाठविण्यामागे नव्याने प्रयत्न केले जात आहेत.
वायनाडमध्ये स्मृती इराणी यांनी केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यांनी एका अंगणवाडी केंद्रालाही भेट दिली. या दौºयात त्या आदिवासी वसाहतींना भेट देणार आहेत तसेच भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
अमेठी या कॉँग्रेसच्या बालेकिल्यात राहूल गांधी यांच्या विरोधात स्मृति इराणी उभ्या ठाकल्या होत्या. २०१४ च्या निवडणुकांत त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यानंतरही पाच वर्षे त्या अमेठी मतदारसंघात कार्यरत राहिल्या. गावोगावी संपर्क ठेवला. त्यामुळेच २०१९ च्या निवडणुकांत त्यांच्या धास्तीने राहूल गांधी यांनी अमेठीबरोबरच केरळमधील वायनाडमध्येही निवडणूक लढविली. आता स्मृति इराणी यांनी वायनाडकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे.
Smriti Irani’s move came as a shock to the Congress
महत्वाच्या बातम्या
- भीमा कोरेगाव दंगल : पवारांचे आरोप ठरले खोटे; पोलिसांची संभाजी भिडेंना क्लीन चिट; आयोगापुढे पवारांची आज साक्ष
- भारत वृत्तपत्र स्वातंत्र्यात जगात १५० व्या ठिकाणी, पहिला क्रमांक नॉवेर्चा, तर डेन्मार्क दुसरा
- Raj Thackeray : मनसे इफेक्ट; मुंब्रा, कापूरबावडीतील मशिदींवरील भोंगे उतरवले!!
- NIA Affidavit : मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेने दिले प्रदीप शर्माला 45 लाख!!