• Download App
    ‘’हे कसलं प्रेम जे...’’ म्हणत स्मृती इराणींनी राहुल गांधींना लगावला टोला! Smriti Iranis criticism of Rahul Gandhi saying What kind of love

    ‘’हे कसलं प्रेम जे…’’ म्हणत स्मृती इराणींनी राहुल गांधींना लगावला टोला!

    ‘मोहब्बत की दुकान’वरून साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटलं आहे?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ‘’मोहब्बतच्या  दुकान’ची खिल्ली उडवत केंद्रीय मंत्री म्हणाल्या- “हे कसले प्रेम आहे जे शिखांची हत्या करते, हे कसले प्रेम आहे जे चारा लुटणाऱ्यांशी हातमिळवणी करते, हे कसले प्रेम आहे जे सेंगोलचा अपमान करते, आपल्याच संसदेचा अपमान करणारं हे कसलं प्रेम आहे.’’ Smriti Iranis criticism of Rahul Gandhi saying What kind of love

    “हे कसलं प्रेम आहे जे केरळ स्टोरीचा मुद्दा आल्यावर बोलत नाही, हे कसलं प्रेम आहे जे राजस्थानमध्ये महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढल्यावर गप्प बसतं, हे कसलं प्रेम आहे जे त्यांच्याशी हस्तांदोलन करतं, त्यांना मिठी मारतं जे भारतावर टीका करतात, हे कसले प्रेम आहे जे देशाच्या राजधानीत भारत तेरे तुकडे होंगे, असं म्हणणाऱ्यांसोबत आहे?

    राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ या वक्तव्यावर स्मृती इराणी म्हणाल्या, “जेव्हा तुम्ही प्रेमाविषयी बोलता, तेव्हा त्यात शिखांच्या हत्येचा समावेश होतो का? जेव्हा तुम्ही ‘प्रेमा’बद्दल बोलता तेव्हा त्यात राजस्थानातील महिलांच्या अपहरणा समावेश होतो का? जेव्हा तुम्ही प्रेमाबद्दल बोलतो तेव्हा त्यात हिंदू जीवन पद्धतीच्या निषेधाचा समावेश होतो का? जेव्हा तुम्ही प्रेमाबद्दल बोलतात तेव्हा याचा अर्थ ज्यांना भारताला स्थैर्य आणायचे आहे त्यांच्याशी भागीदारी करणे आहे का?

    Smriti Iranis criticism of Rahul Gandhi saying What kind of love

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार