प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज लोकसभेत आले आणि मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केल्याचा बेछूट आरोप करून बसले. सुरुवातीला अध्यात्मात शिरलेले राहुल गांधी नंतर क्राईम स्टोरी मध्ये गुंतले.Smriti Irani targets rahul Gandhi over his remarks of bharat Mata’s assassination
पण राहुल गांधींच्या या भाषणाचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ताबडतोब समाचार घेतला.भाषणाच्या सुरुवातीलाच ‘यू आर नॉट इंडिया’, असे स्मृती इराणी कडाडल्या. जम्मू काश्मीर पासून शिखांच्या हत्याकांडापर्यंत स्मृती इराणी सगळे मुद्दे काढून काँग्रेसला झोडपले. राहुल गांधींच्या भाषणानंतर क्रमवारीत मुद्दामून भाजपने स्मृती इराणी यांचे नाव यादीत ठेवले होते. त्यांनी या संधीचा पुरेपूर वापर करत काँग्रेसचे राजकीय वस्त्रहरण केले.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या टाळ्या
अध्यक्ष महोदय आज तुमच्या आसनासमोर ज्या प्रकारच आक्रमक वर्तन पहायला मिळालं, ते मान्य नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतमातेची हत्या केली, असे बोलले गेले. काँग्रेस पक्ष त्यावेळी इथे टाळ्या वाजवत होता. भारतमातेची हत्या झाली, असे बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येते, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे. मणिपूर विभाजीत नाहीय, तो देशाचा अविभाज्य भाग आहे” असं स्मृती इराणी म्हणाल्या.
‘राहुल गांधी तुमच्यामध्ये हिंमत असेल तर….’
“तुमच्या सहकारी पक्षाचा नेता तामिळनाडूत काय म्हणाला? भारताचा अर्थ फक्त उत्तर भारत होतो. राहुल गांधी यांच्यामध्ये हिम्मत असेल, तर तुम्ही तुमचा सहकारी डीएमकेच म्हणणं खोडून दाखवा. काश्मीरला भारतापासून वेगळ केलं पाहिजे असं जो काँग्रेस नेता म्हणतो, त्यावर तुम्ही का बोलत नाही?” असं स्मृती इराणी म्हणाल्या.
काश्मिरी पंडितांवर बोलण्याची तुमची इच्छा नाही’
स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख केला. स्मृती इराणी यांनी गिरिजा टिक्कू, शीला भट्ट यांच्यासोबत झालेल्या घटनांचा उल्लेख केला. आम्ही काश्मिरी पंडितांवर बोलाव अशी तुमची इच्छा नाही” असं स्मृती इराणी म्हणाल्या.
जम्मू-काश्मीर मुद्यावरुन काँग्रेसला घेरलं
स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. “एकवेळ अशी होती की, काश्मीरमध्ये रक्तपात झालेला. पण राहुल गांधी जेव्हा काश्मीरमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत पोहोचले, तिथे फिरत होते. हे मोदी सरकारने काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यामुळे शक्य झालं. काँग्रेस नेते पुन्हा तिथे गेले, त्यावेळी त्यांनी अनुच्छेद 370 लागू करण्याबद्दल भाष्य केले.
Smriti Irani targets rahul Gandhi over his remarks of bharat Mata’s assassination
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग
- मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
- आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!
- 82 % हिंदूंचा भारत आहेच हिंदू राष्ट्र!!; कमलनाथांना उपरती की नवी राजकीय चलाखी??