• Download App
    देशात स्मार्टफोनधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत तीन वर्षांत तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ Smartphone users in India is growing very fastly

    देशात स्मार्टफोनधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत तीन वर्षांत तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – देशातील स्मार्टफोनधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. सुमारे ६७ टक्के विद्यार्थ्यांच्या घरात किमान एकतरी स्मार्टफोन आहे. मात्र २६ टक्के विद्यार्थी अजूनही स्मार्टफोनपासून वंचित आहेत, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या १६ व्या वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवालातून स्पष्ट झाले.Smartphone users in India is growing very fastly

    सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. मात्र किमान ६७ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असला तरी त्यातील सुमारे २६.१ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप स्मार्टफोन वापरण्यास मिळत नाही.



     

    तसेच भावंडे असणाऱ्या घरात वयाने मोठ्या असलेल्या मुलाला स्मार्टफोन वापरण्यास प्राधान्य दिले जाते, असा निष्कर्ष या अहवालातून समोर आला आहे. विशेष म्हणजे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा स्मार्टफोन घेण्यावर फारसा फरक पडत नाही. मात्र पालकांच्या शैक्षणिक पात्रतेचा त्यावर परिणाम होत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक इयत्ता नववी अथवा त्याहून अधिक शिकले आहेत, अशा ८० टक्के मुलांकडे स्मार्टफोन आहे.

    तर इयत्ता पाचवी अथवा त्याहून कमी शिकलेले पालक असलेल्या ५० टक्के मुलांकडेच स्मार्टफोन आहे, असे चित्र या अहवालात दिसून आले. अर्थात कमी शिकलेल्या पालकांपैकी सुमारे २५ टक्के पालकांनी मार्च २०२० नंतर आपल्या मुलांना स्मार्टफोन घेऊन दिले असल्याचेही निदर्शनास आले.

    Smartphone users in India is growing very fastly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!