• Download App
    देशात यंदा १०३ टक्के पावसाची शक्यता , स्कायमेटने वर्तविला दिलासदायक अंदाज|Sky mate predicts Good monsoon this year

    देशात यंदा १०३ टक्के पावसाची शक्यता , स्कायमेटने वर्तविला दिलासदायक अंदाज

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : देशात यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस १०३ टक्के इतका राहण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने वर्तवला आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येण्याची शक्यता आहे.Sky mate predicts Good monsoon this year

    स्कायमेट या संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार जूनमध्ये चांगला पाऊस पडेल आणि मुंबईत मॉन्सून वेळेत दाखल होईल. सरासरी ८८०.६ मिलिमीटर पाऊस पडला तर तो सामान्य पाऊस असे गृहीत धरले जाते. मात्र, स्कायमेटचा अंदाजानुसार देशात यंदा ९०७ मिलिमीटर इतका पाऊस पडेल.



    हा अंदाज खरा ठरला तर सलग तिसऱ्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.यंदा जुलैमध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात चांगला पाऊस पडणार आहे. तर पूर्वेकडील भागात आणि कर्नाटकामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    Sky mate predicts Good monsoon this year

    Related posts

    Assam Govt : आसाममध्ये 40 लाख महिलांच्या खात्यात ₹9000 हस्तांतरित; 4 महिन्यांचे पैसे एकाच वेळी पाठवले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले- निवडणुकीशी याचा काहीही संबंध नाही

    CBSE Class : CBSEच्या 12वीच्या पेपरवर गाण्याचा क्यूआर कोड; स्कॅन केल्यावर यू-ट्यूब लिंक उघडत आहे, CBSE ने म्हटले- चूक झाली, पण पेपर सुरक्षित

    Chandigarh Firm : अण्वस्त्र आणीबाणीच्या तयारीत खाडीतील देश; चंदीगडमधील औषध कंपनीकडे अणुआपत्तीत उपयुक्त ठरणाऱ्या 1 कोटी कॅप्सूलबाबत विचारणा