विशेष प्रतिनिधी
रांची : कोळसा खाण घोटाळ्यात ईडीच्या कोठडीत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावाची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री थोरली सून आमदार सीता सोरेन यांनी कुटुंबातच बंड केले आहे. आपल्यावर कुटुंबात अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चातल्या सर्व पदांचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्या लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.Sita Soren’s resignation from Jharkhand Mukti Morcha
सोरेन कुटुंबात आपली उपेक्षा होते आहे. आपले काहीही म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे वैतागून आपण झारखंड मुक्ती मोर्चा नावाचा पक्ष सोडत आहोत, असे त्यांनी शिबू सोरेन यांना पत्र लिहून जाहीर केले.
हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी परवाच मुंबईत इंडिया आघाडीच्या महारॅलीत येऊन भाषण केले होते. “इंडिया” आघाडी मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा मजबुतीने उभा राहील. भाजप शासनाविरुद्ध संघर्ष करेल, अशी गर्जना कल्पना सोरेन आणि चंपई सोरेन यांनी केली होती. परंतु, आता त्यांना स्वतःच्याच घरात स्वतःच्या सुनेने केलेल्या बंडाला सामोरे जावे लागत आहे.
हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री केले. त्यांच्या मंत्रिमंडळात सीता सोरेन यांना स्थान दिले नाही. त्यामुळे त्या आधीच पक्षावर चिडल्या होत्या. काल परवा चंपई सोरेन आणि कल्पना सोरेन यांनी मुंबईत महाविकास मुंबईत इंडिया आघाडीच्या महारॅली येऊन भाषण केले त्यामुळे सीता सोरेन यांच्या जखमेवर अधिकच मीठ चोळले गेले. त्यामुळे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा सरचिटणीस पद तसेच आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
सीता सोरेन यांचे पती दुर्गा सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिवस्वरेन यांचे थोरले चिरंजीव होते. त्यांच्या वयाच्या 40 व्या वर्षीच ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला. ते देखील झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार होते. त्यांच्या मागे सीता सोरेन यांना झारखंड मुक्ती मोर्चाने तिकीट देऊन आमदार केले, पण सीता सोरेन आणि कल्पना सोरेन या दोन जावांमध्ये सत्ता संघर्ष झाला. त्यामुळे सीता सोरेन यांना झारखंड मुक्ती मोर्चातून बाहेर पडावे लागले आहे.