Thursday, 8 May 2025
  • Download App
    सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; डी. के. शिवकुमारांची सर्व आमदारांसाठी खास हवाई व्यवस्था!!|Siddaramaiah vs. Shivakumar : Heavy lobbying for CM post in Congress; D. K. Shivakumar's special air arrangement for all MLAs!!

    सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; डी. के. शिवकुमारांची सर्व आमदारांसाठी खास हवाई व्यवस्था!!

    प्रतिनिधी

    बेंगलुरु : कर्नाटकात काँग्रेस बहुमताच्या आकड्याच्या आसपास पोहोचली असताना पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून काँग्रेस सतर्क असल्याचे जरी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रसारमाध्यमांना सांगत असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही गट पुढे सरसावत आपापल्या आमदारांची “व्यवस्था” करायच्या कामाला लागले आहेत.Siddaramaiah vs. Shivakumar : Heavy lobbying for CM post in Congress; D. K. Shivakumar’s special air arrangement for all MLAs!!

    सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे, तर अभी नही तो कभी नही अशा अवस्थेत डी. के. शिवकुमार पोहोचल्याने ते आपल्या परीने सर्व आमदारांची हवाई व्यवस्था करण्यात मग्न आहेत. विजयपूर, हुबळी, धारवाड, दावणगिरी, तुमकुर, कोप्पल या सर्व हवाई पट्ट्यांवर डी. के. शिवकुमार यांनी आपल्या अत्यंत विश्वासू व्यक्तींसह खासगी विमाने आणि हेलिकॉप्टर पाठवली असून काँग्रेसचे विजयी उमेदवार “अन्य कोणाच्याही” संपर्कात येण्यापूर्वी त्यांना उचलून थेट बंगलोरला आणून ठेवण्यात येणार आहे.



    त्याच वेळी काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला नाही आणि बहुमताच्या आसपास राहिली तर आपले सर्व आमदार एकत्रित टिकवण्यासाठी हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक केल्याचेही सांगण्यात येत आहे.

    काँग्रेसने ही “व्यवस्था” भाजपकडून होणारा संभाव्य घोडेबाजार रोखण्यासाठी केल्याचे जरी काँग्रेसचे नेते सांगत असले तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदाच्या लॉबिंग मधली ही खरी “व्यवस्था” आहे. कारण सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे, डी. के. शिवकुमार यांच्यासाठी अभिनय अभी नही तो कभी नही अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याने ते स्वतःचे आमदारांची लॉबी पक्की करण्याच्या मागे लागले आहेत आणि यातूनच त्यांनी विजय आमदारांना तातडीने बंगलोरला आणण्यासाठी हवाई व्यवस्था केली आहे.

    भाजप पराभूत झाल्यामुळे तो पक्ष घोडेबाजार करणार अशी वातावरण निर्मिती करण्यात काँग्रेस नेते पुढे आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आदी नेत्यांनी प्रसार माध्यमांमध्ये तसे परसेप्शन निर्माण करणे चालू केले आहे. पण प्रत्यक्षात ही लढाई काँग्रेस अंतर्गत असून मुख्यमंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग हा सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला आहे. यामध्ये सिद्धरामय्या बाजी मारणार?? की डी. के. शिवकुमार त्यांच्यावर मात करत पुढे सरकणार?? की सिद्धरामय आणि डी. के. शिवकुमार दोन्ही नकोत त्याऐवजी तिसराच म्हणजे थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Siddaramaiah vs. Shivakumar : Heavy lobbying for CM post in Congress; D. K. Shivakumar’s special air arrangement for all MLAs!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले- भारत 2040 पर्यंत चंद्रावर उतरेल; चांद्रयान 2 एक यशस्वी मोहीम होती

    Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सरकारचा निर्णय, २१ विमानतळ १० मे पर्यंत बंद राहणार

    Harmony agreement : उद्योग अन् शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक सहकार्य सुनिश्चित करणारा सामंजस्य करार!

    Icon News Hub