वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला इशारा दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, जर फेसबुक राज्य पोलिसांना सहकार्य करू शकत नसेल, तर ते संपूर्ण भारतातील सेवा बंद करण्याचा विचार करावा लागेल.Shut down Facebook all over India’, Karnataka High Court warns social media platform
सौदी अरेबियात तुरुंगात असलेल्या भारतीयाशी संबंधित प्रकरणाच्या तपासासंदर्भात न्यायालयाची ही टिप्पणी आली असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी फेसबुक कर्नाटक पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बिकर्नाकाटे येथील रहिवासी कविता यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठाने सोशल मीडिया कंपनीला हा इशारा दिला. खंडपीठाने फेसबुकला एका आठवड्यात आवश्यक माहितीसह संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले.
केंद्र सरकारकडूनही मागितले उत्तर
सौदी अरेबियात भारतीय नागरिकाच्या खोट्या अटकेच्या मुद्द्यावर आतापर्यंत आमच्या बाजूने काय पावले उचलली गेली, हे केंद्र सरकारने सांगावे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. यासह मंगळुरू पोलिसांना तपास सुरू ठेवण्याचे आणि अहवाल दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Shut down Facebook all over India’, Karnataka High Court warns social media platform
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र शासन, NSE आणि ‘मनी बी’ यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार
- UCC : समान नागरी कायद्याची दीर्घ प्रतिक्षा संपण्याच्या बेतात; कायदे आयोगाने नागरिक, धार्मिक संघटनांकडून मागविल्या सूचना
- तामिळनाडूत तपासासाठी आता CBIला घ्यावी लागणार परवानगी
- विरोधकांचे होईना ऐक्य, तरी लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांचे नितीश कुमार यांचे भाकीत!!