विशेष प्रतिनिधी
चंदीगड : तीन कृषी कायद्यांच्या विरोधासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आड शीख आणि भारत सरकारमधील संघर्ष पेटवण्याचा तसेच शीख व हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट रचण्यात आला होता.Shri Akal Takht thanked the Prime Minister for repealing the Agriculture Act and Conspiracy the scheme, Conspiracy to cause violence among Sikhs and Hindus
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेऊन हा कट उधळला याबाबत श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीतसिंग यांनी आभार मानले आहेत.
ज्ञानी हरप्रीतसिंग यांनी चत्रफीत जारी केली आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, वेळीच कृती करीत मोठा हिंसाचार टाळल्याबद्दल भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे त्यांनी आभार मानले आहेत. व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने एक मोठे राष्ट्रीय संकट टाळले आहे.
या आंदोलनातील काही गट शिखांचा विचार, त्यांचे निशाण, उद्देश, इतिहास आणि भावनांकडे दुर्लक्ष करीत होते. यामुळे भविष्यात होणारे नुकसान या माध्यमातून टाळण्यात आले आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
प्रकाश पर्वाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याबाबत केलेली घोषणा, शेतकऱ्यांची मागितलेली माफी यापेक्षा काहीही मोठे असू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या कल्याणासाठी कृषी कायदे आणले होते, असे अमरिंदरसिंग यांनी सांगितले.
Shri Akal Takht thanked the Prime Minister for repealing the Agriculture Act and disrupting the scheme, Conspiracy to cause violence among Sikhs and Hindus
महत्त्वाच्या बातम्या
- राफेलची गर्जना, भारतीय शस्त्रास्त्र बसविण्याचे काम सुरू होणार
- एमआयएम चा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शंभर जागा लढवणार
- बेजबाबदार वर्चस्ववादी देश सागरी सुरक्षेची स्वार्थी व्याख्या करतात; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा चीनवर हल्लाबोल!!
- माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर सोलापुरात एका मेळाव्यात तरुणाने फेकले काळे ऑईल