विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सुरू झालेल्या हिंसाचारातील सर्वात भीषण प्रकार घडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीवर घरात घुसून तृणमूल कॉँग्रेसच्या सहा कार्यकर्त्यांनी सामूहिक बलात्कार केला.Shocking incident in West Bengal, 34-year-old wife of BJP activist gang-raped by six men including Trinamool Congress activists
आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ही महिला स्थानिक भाजपा कार्यकत्यार्ची पत्नी आहे. सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकत्यार्चा समावेश आहेत. याशिवाय रहमत अली आणि महबूल असे दोन आरोपी आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिला आपल्या घरी एकटी असताना आरोपी घरात शिरले आणि महिलेचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. या महिलेला नुकताच मेंदूघाताचा झटका आला होता. यामुळे महिलेला बोलताना त्रास होत असल्या कारणाने ती मदतीसाठी आवाज देऊ शकली नाही. यावेळी महिलेचा पती कामानिमित्त घराबाहेर होता .
पोलिसांनी सुरुवातीला महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. टीएमसी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्काराचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहे, असा आरोप भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालविया यांनी केला आहे.
सोमवारी संध्याकाळपर्यंत वैद्यकीय तपासणी झाली नव्हती. महिला लेखी स्वरुपात बलात्कार झाल्याचं सांगत असतानाही डॉक्टर वैद्यकीय तपासणी करण्यास तयार नसलेल्या राज्यात काय स्थिती असेल याचा विचार करा. नंतर त्यांनी केली पण दबावापोटी बलात्काराच्या जखमा नसल्याचं सांगत होते, असा आरोप भाजपा आमदार अग्निमित्र पॉल यांनी केला आहे.
Shocking incident in West Bengal, 34-year-old wife of BJP activist gang-raped by six men including Trinamool Congress activists
महत्त्वाच्या बातम्या
- एमपीएससी आयोगावर एकाच जातीचे लोक कसे? एकही ओबीसी सदस्य का नाही? खासदार प्रीतम मुंडे यांचा लोकसभेत सवाल
- मदरशांमधील शिक्षणाची विदारक स्थिती, चारशे वर्षांपूर्वीचा अभ्यासक्रम, विज्ञानाऐवजी अंधश्रध्दांचे शिक्षण
- केरळ सरकारचा कद्रुपणा, ऑलिम्पिक पदकविजेत्या हॉकी संघातील गोलकिपरला ना पुरस्कार ना कौतुक
- आमीर खानने डायलिसिस सेंटर उभारून देण्याचे आश्वासन दिले; पण नंतर फोन उचलणेही बंद केले, अभिनेते अनुपम श्याम यांच्या बंधुचा आरोप
- शाल, पुष्पगुच्छ नको, कन्नड भाषेतील पुस्तके देऊन सन्मान करा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची शासकीय कार्यक्रमासाठी आचारसंहिता