• Download App
    शिवसेनेच्या 40 नव्हे, 55 आमदारांना व्हिप जारी; पण कारवाई न करण्याची ठेवली पळवाट!!|Shivsena issues whip not to 40 shinde faction MLAs, but all 55 MLAs of the party despite Supreme Court order

    शिवसेनेच्या 40 नव्हे, 55 आमदारांना व्हिप जारी; पण कारवाई न करण्याची ठेवली पळवाट!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेने 40 नव्हे, सर्व ५५ आमदारांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी व्हिप जारी केला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप असल्याची माहिती शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.Shivsena issues whip not to 40 shinde faction MLAs, but all 55 MLAs of the party despite Supreme Court order

    दोन आठवडे कोणीही व्हिप बजावू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही व्हिप बजावण्यात आला आहे. पण या व्हिपनुसार अधिवेशन काळासाठी कोणी गैरहजर राहिले तर कारवाई करण्यात येणार नाही असा खुलासा करून त्यात पळवाटही ठेवण्यात आली आहे.


    मुख्य प्रतोद भरत गोगावलेंची माहिती 

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या ४० आमदारांची रविवारी बैठक झाली. यावेळी अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा करून व्हिप बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या शिवसेनेकडे ४० आणि ठाकरे गटाकडे १५ असे विधानसभेत ५५ आमदार आहेत. व्हिप म्हणजे पक्षाचा आदेश असतो. हा आदेश पाळल्यास संबंधित आमदारांचे सभागृह सदस्यत्व अर्थात आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी शिफारस पक्षाच्या वतीने केली जाऊ शकते.

    पण अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप आहे याचा कोणीही भंग केला तर त्याविरोधात कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण गोगावले यांनी दिले आहे.

    Shivsena issues whip not to 40 shinde faction MLAs, but all 55 MLAs of the party despite Supreme Court order

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट