विशेष प्रतिनिधी
मुंबई : व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण करून खंडणी उकळण्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. गोडीगुलाबीने महिला संबंधिताला कपडे उतरवायला सांगतात आणि या कॉलचे रेकॉर्डिंग करून नंतर ब्लॅकमेल सुरू करतात. मुंबईतील शिवसेनेच्या एका आमदारालाही सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून पैशांसाठी धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.Shiv Sena MLA also caught in sextortion, police took immediate action and arrested the accused from Rajasthan
आमदारांबाबतच हा प्रकार घडल्याने पोलीसांनी तातडीने तपास करून आरोपीला राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून अटक केली.तक्रारदार आमदार यांना २० आॅक्टोबरच्या रात्री एक संदेश आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता. तक्रारदार यांनी प्रतिसाद देताच पुढे दोघांमध्ये संभाषण सुरू झाले.
गप्पांमध्ये या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. आमदारानी महिलेला मदत करण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला. महिलेने सुमारे १५ सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली. व्हिडिओ कॉल कट होताच त्या व्यक्तीने आमदारांना एक अश्लील व्हिडिओ पाठवला.
हा व्हिडिओ आमदाराचा व्हिडिओ होता, जो एडिट करण्यात आला होता. या व्हिडिओद्वारे आमदारांना ब्लॅकमेल करून पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी बदनामीच्या भीतीने सुरुवातीला पाच हजार रुपये फोन-पेवर द्वारे पाठवले.
दुसºया दिवशी पुन्हा ब्लॅकमेल करत ११ हजार रुपयांची मागणी केली. यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच, आमदारांनी कुर्ला पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. गुन्हे शाखेनेही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत समांतर तपास सुरू केला.
पुढे फोन-पे नंबरच्या आधारे आरोपी भरतपूर येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे धाव घेतली. तिथे सिक्री पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. तो भरतपूरच्या तेसकी गावातील रहिवासी आहे. त्याने अशा प्रकारे अनेकांना फसवल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहे.
Shiv Sena MLA also caught in sextortion, police took immediate action and arrested the accused from Rajasthan
महत्त्वाच्या बातम्या
- अॅमेझॉन नाही ही तर गांजा कंपनी, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आरोप
- रोहित शर्मा कोहलीनंतर टी-२० क्रिकेटमध्ये ठरला मजबूत कर्णधार
- WATCH : पवारसाहेब कुणाकुणाचा हिशेब मागणार सोमय्या इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ?
- तालिबानचे महिलांवरील निर्बंध आणखी कडक, टीव्ही चॅनल्सना महिला कलाकारांच्या कार्यक्रमांना बंदी, महिला अँकर्सना हिजाब सक्तीचा
- अनिल परब यांनी घेतली शरद पवारांची भेट ; ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली चर्चा