• Download App
    शिवसेनाही उतरली युपी-बिहारी भैय्यांच्या वादात, पक्षाच्या उत्तर भारतीय प्रवक्तया प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या खिल्ली उडविणे बंद करा|Shiv Sena joins UP-Bihari brothers' dispute, party's North Indian spokesperson Priyanka Chaturvedi says stop mocking

    शिवसेनाही उतरली युपी-बिहारी भैय्यांच्या वादात, पक्षाच्या उत्तर भारतीय प्रवक्तया प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या खिल्ली उडविणे बंद करा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकेकाळी यूप-बिहारी भैय्यांच्या विरोधात असणाºया शिवसेनेनेही आता पंजाबमधील वादात उडी घेतली आहे. शिवसेनेच्या उत्तर भारतीय प्रवक्तया प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की यूपी-बिहारचे लोकही भारतीय आहेत, त्यामुळे त्यांची खिल्ली उडवणं बंद करा.Shiv Sena joins UP-Bihari brothers’ dispute, party’s North Indian spokesperson Priyanka Chaturvedi says stop mocking

    पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. ‘भगाओ यूपी-बिहार के भय्या को’ या वक्तव्यावरून शिवसेनेने चन्नी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रियांका चतुवेर्दी यांनी ट्विट केले आहे.



    ‘राजकीय पक्ष यूपी आणि बिहारच्या लोकांचा विकास करण्यात अपयशी ठरले आहेत. यामुळे ज्यांच्याकडे पर्याय आहे, ते पलायन करत आहेत. विदेशात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीयांसारखेच हे आहे. नंतरची सरकारे त्यांना संधी आणि नोकºया देण्यास असमर्थ आहेत.

    पण ते इतर राज्यात असतात तेव्हा ते त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात. स्वस्त मजूर हे तुमचे सेवा देणारे आहेत, ते तुमचे व्यापारी, उद्योजक, आमदार आणि नोकरशहा आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भारतीय आहेत. त्यांची खिल्ली उडवणं थांबवा.

    पंजाबमधील रुपनगरमध्ये काँग्रेसची प्रचारसभा झाली. सरचिटणीस प्रियांका गांधींनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनीही सभेला संबोधित केले. पंजाबींनी एकजूट व्हा. यूपी, बिहार आणि दिल्लीच्या लोकांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका. त्यांना येथे राज्य करायचे आहे’, असे चन्नी म्हणाले. चन्नी यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर अपलोड करून भाजपने सर्व प्रथम प्रश्न उपस्थित केला आहे.

    चन्नींच्या वक्तव्यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले. ‘व्यासपीठावरून पंजाबचे मुख्यमंत्री यूपी, बिहारच्या लोकांचा अपमान करतात आणि प्रियांका गांधी त्यांच्या शेजारी उभ्या राहून हसत, टाळ्या वाजवत आहेत. अशा प्रकारे काँग्रेस उत्तर प्रदेश आणि देशाचा विकास करणार? लोकांना आपापसात भांडायला लावून?

    Shiv Sena joins UP-Bihari brothers’ dispute, party’s North Indian spokesperson Priyanka Chaturvedi says stop mocking

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही