विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपाच्या आकडेमोडीच्या घडामोडीपेक्षा खात्रीने जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाकऱ्या फिरवण्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी अर्थपूर्ण चर्चा झाल्याची खरी बातमी आहे. प्रसार माध्यमांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने आकडेमोडीच्या बातम्या प्राधान्य दिल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात कुणी किती आकड्यांनी जागा लढवायच्या यापेक्षा खात्रीने जिंकण्याच्या जागांवर आणि जिंकण्याची शक्यता असलेल्या जागांचे रूपांतर खात्रीने जिंकण्याच्या जागांवर करण्यासाठी भाकऱ्या फिरवण्यावर अर्थात उमेदवार बदलण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची खरी बातमी आहे. Shinde – Ajit Dad’s meaningful discussion at Amit Shah’s house!!
काल रात्री 12.45 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांच्याशी याविषयीच खलबते केली. यात जागांची अदलाबदल इथपासून ते खात्रीने निवडून आणण्यासाठी वास्तवावर आधारित जागावाटप कसे करता येईल??, यावर तपशीलवार चर्चा झाली. अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या 48 जागांचे “होमवर्क” आधीच पक्के केले आहे. त्यासाठी शिंदे फडणवीस आणि अजितदादांनी खूप आधीपासून “इनपुट” दिली आहेत त्या इनपुटच्या आधारे आणि अमित शाहा यांच्या स्वतःच्या यंत्रणेने दिलेल्या “इनपुटच्या” आधारे खात्रीने निवडून येण्याच्या जागा आणि खात्रीने निवडून आणण्याच्या जागा या संदर्भात तपशील देऊन अमित शाह यांनी शिंदे आणि अजितदादांना उमेदवार बदलण्याचा सल्ला दिल्याचे मानले जात आहे.
शिंदे – अजितदादांपुढचे खरे आव्हान
शिंदे आणि अजित पवार यांच्यापुढे जास्तीत जास्त जागा लढवण्याचे आव्हान नसून भाजपने महायुती त्यांच्यासाठी सोडलेल्या जागांवर उमेदवार बदलण्याचे खरे आव्हान आहे. कारण भाजपला जितक्या सहजतेने उमेदवार बदलणे शक्य होते किंवा होणार आहे, तेवढे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना सहज उमेदवार बदलणे शक्य होणार नाही. कारण त्यांचे विद्यमान खासदार हे पक्षातले हेवीवेट नेते आहेत आणि त्यांनाच बाजूला करणे हे शिंदे आणि अजित पवारांना फार जड जाण्याची शक्यता आहे. किंबहुना “भाकऱ्या फिरवणे” हेच खरे शिंदे अजितदादांसमोर आव्हान आहे. ही महायुतीच्या जागावाटपाची अडचणीची वस्तुस्थिती आहे.
तोच तिढा सोडवण्यासाठी शिंदे आणि अजितदादांनी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचे मानण्यात येत आहे. शिंदे आणि अजितदादांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या भाकऱ्या फिरवल्या, तर तेच उमेदवार उठून अनुक्रमे ठाकरे आणि शरद पवारांकडे जाऊन उमेदवारी मिळवू शकतात, याची भीती शिंदे आणि अजितदादांना वाटते ती भीती कमी कशी करता येईल??, त्यावर तोडगा कसा काढता येईल??, यावर विशेषत्वाने खलबते झाल्याची खरी बातमी आहे.
Shinde – Ajit Dad’s meaningful discussion at Amit Shah’s house!!
महत्वाच्या बातम्या
- फारुख अब्दुल्ला म्हणाले- घराणेशाही असती तर मुख्यमंत्री असताना निवडणूक हरलो नसतो; 370चा आळवला सूर
- शासन आपल्या दारी अंतर्गत सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ
- मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानातून निवडणुकीच्या आखाड्यात??; पश्चिम बंगाल मधून कमळावर लढण्याची शक्यता!!
- नेहेल्यावर देहेल्या ऐवजी दुर्री – तिर्रीच!!; भाजपच्या 195 च्या बदल्यात काँग्रेसचे फक्त 39 उमेदवार जाहीर; राहुल वायनाडमधूनच!!